३१ ऑगस्टपर्यंत शाळा, कॉलेज आणि कोचिंग क्लासेस बंद करोना महामारीची परिस्थिती सामान्य न झाल्याने राज्यातील लॉकडाऊन ३१ ऑगस्टपर्यंत वाढवण्यात आला आहे. देशपातळीवरही अनलॉक ३ साठी केंद्रीय गृहमंत्रालयाने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. यानुसार ३१ ऑगस्टपर्यंत देशातील सर्व शाळा, कॉलेज आणि कोचिंग क्लासेस बंद राहणार आहेत. हा निर्णय राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांशी व्यापक चर्चा केल्यानंतर घेण्यात आला आहे. वरीलप्रमाणे अनलॉकची प्रक्रिया सुरू असली तरी कंटेन्मेंट झोन मध्ये ३१ ऑगस्ट २०२० पर्यंत लॉकडाऊनचे नियम शिथील केले जाणार नाहीत. मार्च महिन्याच्या मध्यापासून देशातील सर्व शाळा, महाविद्यालेय बंद आहेत. कोचिंग क्लासेसही लॉकडाऊनमध्ये बंद झाले आहेत. या सर्व ठिकाणी शिक्षण ऑनलाइन पद्धतीने सुरू आहे.
गृहमंत्रालयाने सांगितलं आहे की, ‘देशातील सर्व शाळा, कॉलेज आणि कोचिंग क्लासेस ३१ ऑगस्टपर्यंत बंद राहणार. ऑनलाइन शिक्षणाची परवानगी आहे आणि याला अधिक प्रोत्साहित केले जाईल.’ याव्यतिरिक्त मेट्रो, सिनेमागृह, स्विमिंग पूल, मनोरंजन पार्क, बार, सभागृहे देखील बंदच राहणार आहेत. मात्र ५ ऑगस्ट २०२० पासून योगाभ्यास आणि व्यायामशाळांना कार्यरत राहण्याची परवानगी दिली जाणार आहे, यासाठी विशेष मानक संचालन प्रक्रिया (एसओपी) आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाकडून जारी केली जाणार आहे.
0 Comments
Post a Comment