तलाठी परीक्षा तीन टप्यात पार पडणार, 'या' तारखेला परीक्षा

JOBMARATHI


पुणे : भूमी अभिलेख विभागाच्या (Land Records Department) वतीने तलाठी (Talathi) (गट-क) पदासाठी घेण्यात येणाऱ्या परीक्षेचे वेळापत्रक (Talathi Exam Time Table) आणि तारखा जाहीर झाल्या आहेत. 17 ऑगस्ट ते 14 सप्टेंबर या कालावधीत तलाठी पदाची परीक्षा घेण्यात येणार आहे. परीक्षेची तयारी पूर्ण झाली असून पात्र उमेदवारांना परीक्षा केंद्राचे नाव किमान दहा दिवस अगोदर संकेतस्थळावर कळविण्यात येणार आहे. (Talathi Recruitment Exam Time Table Announced Exam from 17th August to 14th September) https://www.jobmarathi.com/2023/08/talathi-bharti-2023-2023.html


उमेदवारांना योग्य पद्धतीने परीक्षा देता यावी यासाठी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात एक परीक्षा केंद्र असणार आहे. जमाबंदी आयुक्तालयाने सांगितले की, यावेळच्या तलाठी भरतीत अभियांत्रिकी, व्यवस्थापन, संगणक विज्ञान, विज्ञान, कला, वाणिज्य इत्यादी शाखांतील पदव्युत्तर पदवीधारकांनी मोठ्या संख्येने अर्ज केले आहेत. तलाठी पदाच्या 4466 जागांसाठी राज्यभरातून 11 लाख दहा हजार 53 उमेदवारांनी अर्ज केले आहेत.

या विक्रमी संख्येमुळं विविध केंद्रावर तीन पाळीत ही परीक्षा घेण्याचा निर्णय घेण्याचा निर्णय प्रशानसाने घेतला आहे. या परीक्षेची वेळ सकाळी 9 ते 11, दुपारी 12.30 ते 2.30 आणि दुपारी 4.30 ते 6.30 अशी आहे.


परीक्षा केंद्रावर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी ही दक्षता घेण्यात आली आहे. TCS कंपनीद्वारे ही परीक्षा घेतली जाणार आहे, अशी माहिती भूमी अभिलेख विभागाचे अपर जमाबंदी आयुक्त आणि राज्य परीक्षा समन्वयक आनंद रायते यांनी दिली. दरम्यान, तलाठी पदासाठी एकूण 200 गुणांची संगणक आधारित चाचणी घेतली जाणार आहे. गुणवत्ता यादीत समाविष्ट होण्यासाठी एकूण गुणांपैकी किमान 45 टक्के गुण मिळणे आवश्यक असल्याचेही रायते यांनी सांगितले.


परीक्षेचे टप्पे कसे आहेत?

पहिला टप्पा - 17, 18, 19, 20, 21, 22 ऑगस्ट

दुसरा टप्पा - 26 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर

तिसरा टप्पा - 4 सप्टेंबर ते 14 सप्टेंबर

23, 24, 25 ऑगस्ट आणि 2, 3, 7, 9, 11, 12 आणि 13 सप्टेंबर रोजी परीक्षा होणार नाहीत.