वयायाम करताना 'या' गोष्टींना विसरू नका!
Jobmarathi I Health
अनेकदा व्यायामाची सुरुवात उत्साहात होत आणि गाडी अचानक थांबते. असे होऊ नये म्हणून तुम्हाला उपयुक्त टिप्स पाहुयात...
1. वॉर्मअप बंधनकारक : कोणताही व्यायाम सुरू करण्यापूर्वी वॉर्मअप करणे बंधनकारक आहेत. कारण यामुळे आपले शरीर व्यायामासाठी पूर्णपणे तयार होते. मात्र जर आपण वॉर्मअपला दुर्लक्ष करत असाल तर, हे शरीरास हानिकारक ठरु शकते.
2. नियमानुसार करा : व्यायामाचा प्रकार पाहून नियमानुसार व्यायाम करायला हवा. त्यात आपल्या मनानुसार अजिबात बदल करू नये.
3. सुरुवात करताना... : व्यायामाच्या सुरुवातीच्या काळात अति व्यायाम करणे टाळा. तसेच प्रशिक्षकाप्रमाणे व्यायाम करा.
4. आहाराची काळजी : आहाराबरोबर व्यायामाचीही काळजी घेणे तितकेच गरजेचे आहे. त्यामुळे वेगाने पचवणारी प्रथिने आणि कार्बोहायड्रेट पर्याय निवडा.
5. वयानुसार व्यायाम : आपल्या व्यायामाची निवड आपल्या वयाच्या मानाने करावी. तसेच सुरू करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
Disclaimer : आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जबाबदारी जॉबमराठी घेत नाही.
0 Comments
Post a Comment