विनातारण' 10 हजारांपर्यंतचे कर्ज; असा घ्या लाभ!
Jobmarathi I Finance
कोरोनामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या सामान्य लोकांसाठी केंद्र सरकारची 'पंतप्रधान स्वानिधी योजना' म्हणजे संजीवनी आहे. कारण योजनेद्वारे कुठलीही वस्तू तारण न ठेवता हे कर्ज मिळणार आहे.
या योजनेंतर्गत पथ विक्रेत्यांना 10 हजार रुपयांपर्यंतचे कर्ज दिले जाते. जे लोक रस्त्यावर दुकानं थाटून आणि कामधंदा करून उपजीविका चालवतात, अशा लोकांसाठी ही योजना खास लाभदायी ठरत आहे.
📝 'या' पद्धतीने करा अर्ज :
● प्रथम http://pmsvanidhi.mohua.gov.in/ या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
● त्यानंतर वेबसाईटच्या पहिल्या पानावर 'कर्जासाठी अर्ज करण्याची योजना?' चा पर्याय दिसेल. त्यावर क्लिक करा.
● यावरील सर्व बाबी काळजीपूर्वक वाचून घ्या. पुढे 'व्ह्यू मोअर' या पर्यायावर क्लिक करा.
● त्यानंतर 'व्ह्यू / डाऊनलोड फॉर्म' वर क्लिक करा. त्यानंतर फॉर्म कर्ज योजनेसाठी उघडेल.
● हा फॉर्म डाऊनलोड करून भरा. सर्व आवश्यक कागदपत्रांसह तो फॉर्म शासकीय अधिकृत कार्यालयात जमा करा.
खालील भरती पण पहा
मेगाभरती! LIC मध्ये 5000 जागा | Mega recruitment! 5000 seats in LIC
औष्णिक विद्युत केंद्रांतर्गत 125 जागांसाठी भरती | Recruitment for 125 posts under Thermal Power Station
साऊथ इंडियन बँकेंतर्गत विविध पदांसाठी भरती | Recruitment for various posts under South Indian Bank
[IBPS Bharti] IBPS मार्फत ‘लिपिक’ पदाची मेगा भरती
ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी ‘टीम इंडिया’ची घोषणा | Team India announced for Australia tou
0 Comments
Post a Comment