💁‍♂ आजचे राशिभविष्य; 30 जुले  2023


Jobmarathi | Astrology


Horoscope Today 30 July 2023 Astrology-prediction-in-marathi-rashibhavishya


Horoscope Today 30 July 2023 : आज रवीवार हा महत्त्वाचा दिवस आहे. ग्रहांच्या चालीनुसार मेष राशीच्या लोकांनी आरोग्याची काळजी घेणं गरजेचं आहे. तर, कन्या राशीच्या लोकांनी आज प्रवास टाळावा. एकूणच मेष ते मीन राशीसाठी आजचा शनिवार कसा असेल? काय सांगतात तुमच्या नशिबाचे भाग्यवान तारे? जाणून घ्या आजचं राशीभविष्य. 
 
मेष

मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला जाईल. जर तुम्ही व्यापारी असाल तर काळजीपूर्वक व्यवहार करा. तुम्ही भागीदारीत कोणताही व्यवसाय करत असाल तर आजच तुम्ही तुमच्या जोडीदाराकडून पैशांचा सर्व हिशेब घ्या, अन्यथा तुमची फसवणूक होऊ शकते. तुम्हाला आर्थिक संकटाला सामोरे जावे लागू शकते. आज तुमचे मन एखाद्या गोष्टीबद्दल खूप अस्वस्थ असणार आहे. तुमच्या मानसिकतेमुळे आज तुमचा स्वभावही चिडचिडा होईल. आरोग्याची काळजी घ्या. पोटाशी संबंधित कोणतीही समस्या उद्भवू शकते, म्हणून डॉक्टरांचा सल्ला घ्या. कुटुंबियांना थोडा वेळ द्या. मोठ्यांचा आदर करा, त्यांचे आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी असतील.
 

वृषभ

वृषभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस थोडा संघर्षाचा जाऊ शकतो. आज कुटुंबात किंवा शेजारच्या कोणत्याही वादात पडू नका, अन्यथा तुम्हाला नंतर पश्चात्ताप करावा लागू शकतो.  आयुष्यातील व्यस्ततेमुळे तुमच्या तब्येतीत चढ-उतार असतील. संतुलित आहार घ्या. बाहेरचे अन्न खाणे टाळा, अन्यथा पोटाशी संबंधित समस्या उद्भवू शकतात. व्यावसायिकांनी आपल्या व्यवसायात कोणतेही नवीन बदल करू नयेत.  अन्यथा तुम्हाला नुकसान सहन करावे लागेल. तुम्हाला प्रवासाला जायचे असेल तर गाडी चालवताना काळजी घ्या.
 
मिथुन

मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला जाईल. आज तुमची आर्थिक स्थिती चांगली राहील. कुटुंबात आनंदाचे वातावरण निर्माण होईल आणि त्यामुळे तुमचे मनही खूप आनंदी राहील. आरोग्याची काळजी घ्या. तुमच्या मुलांनाही नोकरीत प्रगतीची संधी मिळू शकते. तुमची काही महत्वाची कामे आज मध्येच थांबतील, ज्यामुळे तुमचे नुकसान होऊ शकते. जोडीदाराचा पूर्ण पाठिंबा मिळेल. आपल्या बोलण्यावर संयम ठेवा. मित्रांचं सहकार्य तुमच्यासाठी मोलाचं ठरेल.
 

कर्क

कर्क राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला जाणार आहे. तुम्ही कोणताही व्यवसाय करत असाल तर आज तुम्हाला व्यवसायात भरपूर नफा होऊ शकतो, त्यामुळे तुमचे सर्व आर्थिक संकट दूर होतील. व्यवसायात तुमची चांगली प्रगती होईल. तुमच्या विरोधकांपासून दूर राहा. प्रत्येक क्षेत्रात तुम्हाला तुमच्या कुटुंबियांचे पूर्ण सहकार्य मिळेल. तुमचे धैर्य आणि बुद्धिमत्ता पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटेल. तुमच्या कामाची योजना तुम्ही तयार करू शकता. तुम्ही खूप मेहनती व्यक्ती आहात, त्यामुळे तुमचे ध्येय साध्य करू शकतात. काही कारणास्तव त्यांची तब्येत बिघडू शकते, त्यामुळे आरोग्याची काळजी घ्या. 
 
सिंह

सिंह राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस थोडा जोखमीचा असू शकतो. जर तुम्ही व्यावसायिक असाल तर आज तुमचा कोणताही व्यवसाय अतिशय काळजीपूर्वक करा. अन्यथा तुम्हाला आर्थिक नुकसान सहन करावे लागू शकते. आज तुमचे कुटुंबातील सदस्यांबरोबर काही मतभेद होऊ शकतात. ज्यामुळे तुमचे मन थोडे चंचल राहील. मन शांत करण्यासाठी, धार्मिक कार्यक्रमात सहभागी व्हा. आरोग्याची काळजी घ्या. विनाकारण घराबाहेर पडू नका.   
 

कन्या

कन्या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला आहे. कौटुंबिक जीवनात सुख-शांती राहिल. सर्वजण एकत्र काम करताना दिसणार आहेत. आज तुम्ही तुमच्या कुटुंबातील सदस्यांसह एखाद्या धार्मिक स्थळाला भेट देण्याची योजना कराल. आरोग्य पूर्वीपेक्षा सुधारेल, परंतु आपल्या दैनंदिन दिनचर्यामध्ये मॉर्निंग वॉक, योग आणि ध्यान यांचा समावेश करा. उत्पन्नाच्या संधी उपलब्ध होतील. मित्रांचे सहकार्य मिळेल. शैक्षणिक क्षेत्रात तुम्ही करत असलेल्या प्रयत्नांमध्ये यश मिळेल. 

तूळ

तूळ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला आहे. नोकरदार लोकांना आज तुमच्या नोकरीत प्रगतीच्या संधी मिळतील. याचा भविष्यात तुम्हाला मोठा फायदा होऊ शकतो. अधिकाऱ्यांशी बोलताना बोलण्यावर नियंत्रण ठेवा. जीवनशैलीच्या वस्तूंकडे कल वाढेल, त्यामुळे जास्त खर्च होईल. घरात सुख-शांती नांदेल. जोडीदाराचा पूर्ण पाठिंबा मिळेल. नोकरदार लोकांना नवीन नोकरीची ऑफर देखील मिळेल, ज्यामध्ये उत्पन्न अधिक असेल. तुमचे स्थानही वाढेल. 

वृश्चिक 

वृश्चिक राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस आनंदाने भरलेला जाणार आहे. ज्यांना राजकारणात करिअर करायचे आहे, त्यांना यश मिळेल. सभांना संबोधित करण्याची संधी मिळेल. आज नेत्यांनाही भेटण्याची संधी मिळेल, त्यामुळे तुम्ही खूप आनंदी राहाल. कटू गोष्टींकडे दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करा. रागावर नियंत्रण ठेवा. बोलण्यात गोडवा ठेवा. सहकारी आणि वरिष्ठांचे सहकार्य मिळेल. घरातून बाहेर पडण्यापूर्वी वडिलांचे चरणस्पर्श करून आशीर्वाद घ्या, तुमची सर्व कामे पूर्ण होतील. 


धनु 

धनु राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस आनंददायी असणार आहे. व्यवसाय करणाऱ्या लोकांना व्यवसायात इच्छित नफा मिळाल्यानंतर ते खूप आनंदी होतील. आर्थिक स्थिती मजबूत राहील. तुमची रखडलेली कामेही पूर्ण होतील. जर तुम्ही कोणाकडून पैसे घेतले असतील तर तेही तुम्ही परत करु शकता. खर्च आणि गुंतवणूक वाढत राहतील. आज तुम्ही तुमच्या कुटुंबातील सदस्यांसाठी काही खरेदी कराल. लोकांकडून प्रशंसा मिळेल. तुम्ही केलेल्या कामाचे कौतुक होईल. समाजाच्या भल्यासाठी काम करण्याची संधी मिळेल. 

मकर

मकर राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला असणार आहे. जे विद्यार्थी स्पर्धा परीक्षेची तयारी करतायत त्यांना यश मिळेल. आज तुमची सर्व रखडलेली कामे पूर्ण होतील. तुमच्या व्यवसायात लाभ होईल. आळशीपणामुळे तुम्ही तुमची कामे उद्यावर ढकलू शकता. तुम्ही तुमचे विचार तुमच्या पालकांबरोबर शेअर करा. कार्यक्षेत्रात वरिष्ठ आणि कनिष्ठांचे सहकार्य लाभेल, ज्यामुळे तुम्ही तुमची कामे वेळेपूर्वी पूर्ण करू शकाल. मुलाला चांगली नोकरी मिळाली तर खूप आनंद होईल. आज धार्मिक स्थळांना भेट द्या. तुम्हाला प्रसन्न वाटेल. 

कुंभ

कुंभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस खूप आनंददायी आहे. आज तुम्हाला राजकारणात यश मिळेल. तरूणांसाठी आज त्यांचे प्रेम जीवन चांगले राहील. तुम्ही तुमच्या पार्टनरबरोबर रोमँटिक डिनरवर जाल. व्यवसाय करणारे लोक देखील व्यवसायाशी संबंधित सहलीला जाण्याची शक्यता आहे, जे त्यांच्यासाठी खूप फायदेशीर असेल. आज तुम्हाला पैशांची बचत करण्यात अनेक अडचणींना सामोरे जावे लागू शकते. आज नवीन पाहुण्यांच्या आगमनाने कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. कुटुंबातील सदस्यांसह धार्मिक स्थळांना भेट देण्याची योजना आखा. जे घरबसल्या ऑनलाईन काम करतात, त्यांना चांगले पैसे मिळू शकतात.


मीन

मीन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस खूप चांगला आहे. आज तुमचे रखडेले पैसे तुम्हाला परत मिळतील. आज तुम्हाला नातेवाईक किंवा मित्र मंडळींकडून भेटवस्तू मिळू शकतील. बँकिंग आणि आयटी क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना आज आर्थिक लाभ होऊ शकतो. आरोग्य चांगले राहील. मित्रांच्या माध्यमातून उत्पन्नाच्या संधी प्राप्त होतील. आज स्वतःसाठी थोडी खरेदी करा. नातेवाईकांकडून चांगली बातमी ऐकायला मिळेल. ज्या लोकांना राजकारणात करिअर करायचे आहे, त्यांना यश मिळेल.









मेष (Aries Horoscope Today):  आज तुम्ही आपला किमती वेळ मित्रांसोबत व्यतीत करू शकता. तुमचा/तुमची जोडीदार तुमच्याकडे लक्ष देत नाही, असे तुम्हाला वाटेल. परंतु प्रेमामध्ये अनावश्यक मागण्यांसाठी झुकू नका. आजचा दिवस अनकूल आहे. कामाच्या ठिकाणी त्याचा जास्तीत जास्त फायदा करून घ्या. 



2. वृषभ (Taurus Horoscope Today): सातत्याने सकारात्मक विचार करण्याची प्रवृत्ती फलदायी ठरेल. तुम्हाला यश मिळेल. आज तुम्हाला आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. परंतु पैसे साठवण्याची सवय लाभदायी ठरू शकेल.


3. मिथुन (Gemini Horoscope Today): आजचा दिवस नोकरी धंद्यात स्पर्धामय राहील आणि त्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न कराल. त्यातूनही नवे कार्य सुरू करण्याची प्रेरणा मिळेल व ते सुरूही कराल. 


4. कर्क (Cancer Horoscope Today): मनात निर्माण होणार्‍या अनिश्चिततेमुळे मानसिक अस्वास्थ्य राहील. मनःस्थिती द्विधा असेल. बोलण्यावर संयम ठेवा आणि कोणाशी वादविवाद, भांडण झाल्याने परिस्थिती आणखीच खराब होईल. जिभेवर ताबा ठेवा. 


5. सिंह (Leo Horoscope Today): घरातील वातावरण बिघडू नये यासाठी वाद-विवाद टाळा. आईच्या आरोग्याची काळजी घ्या. धन आणि प्रतिष्ठेची हानी असे कृत्य करू नका. स्त्रियांशी व्यवहार करताना सावध राहा.


6. कन्या (Virgo Horoscope Today): घरातील व्यक्तींसमवेत वेळ आनंदात जाईल. धनलाभाचा योग आहे. कामात यशस्वी व्हाल. प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल. 



7. तुळ (Libra Horoscope Today): ताणतणाव, दडपणाच्या मनःस्थितीवर मात करता येईल, मात्र आपल्या कुटुंबाचा पाठिंबा तुम्हाला मदत करेल. तसेच तुमच्या जोडीदाराची प्रकृती खालावल्यामुळे तुम्ही तणावाखाली येण्याची शक्यता आहे. जोडीदाराची काळजी घ्या. 


8. वृश्चिक (Scorpio Horoscope Today): आज व्यापार धंद्यात मोठे यश मिळेल पण कायद्याच्या कचाट्यात सापडण्याची भीती आहे. व्यापार उद्योगाच्या दृष्टीने भावी योजना सुफळ होतील. 


9. धनु (Sagittarius Horoscope Today): व्यापारात लाभाची शक्यता. गृहस्थी जीवनात आनंदाचे वातावरण राहील. कुटुंबात प्रेमभावना वाढेल. शुभ दिवस 


10. मकर (Capricorn Horoscope Today): कोणत्याही गोष्टीत खंबीर मनाने निर्णय घेऊ न शकल्याने चालून आलेल्या संधीचा फायदा उठवता येणार नाही. महत्त्वाचे निर्णय आज घेऊ नका. संततीशी चर्चा होईल. घरातील सदस्यांचे सल्ले ऐका.


11. कुंभ (Aquarius Horoscope Today): गैरसमज दूर केल्यामुळे प्रत्येक बाब लवकर पूर्ण होईल. आरोग्याच्या बाबतीत काळजी घ्या. मानप्रतिष्ठा भंग पावेल. 


12. मीन (Pisces Horoscope Today): आज बौद्धिक आणि तार्किक विचार विनिमयासाठी दिवस चांगला. सामाजिक सन्मान मिळेल. मित्रांशी भेट होईल. दिवस आनंदात व्यतीत कराल.






 आजचे राशिभविष्य; 15 एप्रिल 2023


1. मेष : आज आपला वेळ गडबडीत जाईल. स्पर्धात्मक कार्यात आपण आघाडीवर राहणार आहात. आपले काम दुसर्यावर सोपवू नका.


2. वृषभ : अपेक्षित पत्रे येतील. महत्वाची कामे पार पाडण्याच्या दृष्टीने अपेक्षित लोकांच्या गाठीभेटी होतील.


3. मिथुन : गृहसौख्याच्या दृष्टीने आजचा दिवस आपणास अनुकूल नसल्याने कौटुंबिक कलहझाल्यास दुर्लक्षित करावेत. 


4. कर्क : अचानक खर्च उद्भवेल. गुंतवणूकीचा विचार करत असाल तर फसवणूकीची शक्यता असल्याने आपला विचार पुढे ढकलावा. 



5. सिंह : महत्वाची कामे पार पाडताना व्यत्यय जाणवेल. आपली तब्येत सांभाळा. मानसिक स्वास्थ बिघणारी घटना घडेल. 


6. कन्या : महत्वाची कामे टाळावीत. तब्येतीच्या तक्रारी राहीतल. अचानक मोठा खर्च करावा लागेल. 


7. तूळ : मित्रपरिवाराकडून अपेक्षाभंग होतील. आपल्या हातून आज दानधर्म होईल. आर्थिक गुंतवणूकीचा विचार आज न करता पुढे ढकलावा.


8. वृश्चिक : नोकरीत वरिष्ठ कामाची जास्त जबाबदारी आपल्यावर टाकतील. जास्त कामामुळे कामात चूक होणार नाही याची दक्षता घ्या.

.

9. धनु : नोकरीत बढतीचे योग संभवतात. कामामुळे प्रवासयोग घडतील, आपल्या जोडीदाराला अनुकूल संधी चालून येतील.


10. मकर : आज आपल्याला अचानक धनप्राप्तीचा योग आहे. करमणुकीच्या कार्यक्रमात सक्रीय सहभाग घ्याल. मानसिक स्वास्थ लाभेल.


11. कुंभ : व्यावसायिक करार करताना सावधगिरी बाळगावी. कौटुंबिक सौख्य लाभेल. घरातील वातावरण आनंदी, उत्साही, राहील.


12. मीन : नोकरांवर विसंबून राहू नका. आरोग्याच्या तक्रारी राहतील, महत्वाची कामे टाळावीत.
.







आजचे राशिभविष्य; 07 डिसेंबर 2020

1. मेष : अपेक्षित गाठीभेटी होतील कौटुंबक सौख्य लाभेल. प्रयत्नांती परमेश्वर या उक्तीचा प्रत्यय येईल. आपले आवडते छंद जोपासण्यासाठी वेळ देता येईल.


2. वृषभ : अपेक्षित पत्रै येतील धडाडीने कामे मार्गी लावाल. आजचा दिवस लिखाणासाठी अनुकूल आहे. अनावश्यक प्रवास टाळणे हिताचे आहे. 


3. मिथुन : आपल्या गोड बोलण्यामुळे महत्वाची कामे पूर्णत्वास जातील. अनुकूल संधी चालून येतील सुवर्ण खरेदीस अनुकूलदिवस आहे. 


4. कर्क : कौटुंबिक सुखात व्यत्यय येण्याची शक्यता रहाते. परिचयातून कामे होतील. अचानक धनलाभाचे योग आहेत. व्यावसायिक भाग्य बीजे पेरली जातील. 



5. सिंह : नोकरी-व्यवसायानिमित्त परदेशगमनास आजचा दिवस अनुकूल आहे. अचानक खर्च उद्भवेल. काका-आत्यांचासवास लाभेल. 


6. कन्या : मित्रपरिवारांकडून आर्थिक सहकार्य मिळेल. आजा दिवस गुतवणूकीसाठी अनुकूल आहे. सहकार्यांबरोबरमिष्टान्नभोजनाचा योग येईल. 


7. तूळ : तरुणांच्या नोकरीविषयक मुलाखती यशस्वी होतील. पूर्वी केलेल्या एखाद्या कामाची वरिष्ठांकडून प्रशंसा होईल. लॉटरीचेतिकिट घेऊन पहा, यश संभवते. 


8. वृश्चिक : नोकरी-व्यवसायाच्या ठिकाणी आपले निर्णय ग्राह्य धरले जातील. मौल्यवान वस्तू खरेदीचा योग आहे. आध्यात्मिकप्रगतीस अनुकूल दिवस आहे. 



9. धनु : भागिदारीचा व्यवसाय करणार्यांचे कार्यक्षेत्र वाढेल. जुनी येणी वसूल होतील. आपल्या हातून दानधर्म होईल. तीर्थस्थळांना भेटी देण्याचे योग येतील. 


10. मकर : उपवर तरुणांना जोडीदार निवडण्यास अनुकूल दिवस आहे. शत्रूंपासून सावध रहा. महत्वाची कागदपत्रे मिळतील,व्यावसायिक करारमदार होतील. 


11. कुंभ : मातुल घराण्याच्या मदतीने व्यवसायात भाग्यवृद्धी होईल. विरोधकांवर मात कराल. महत्वाची कामे आजच पूर्ण करा. 



12. मीन : संततीच्या शैक्षणिकप्रगतीमुळे धन्यता वाटेल. आध्यात्मिक प्रगतीसाठी आजचा दिवस अनुकूल आहे. सुग्रास भोजनाचायोग आहे. 


















1. मेष : चांगल्या कामासाठी पैसे खर्च होतील. विशेष मान, सन्मान मिळतील. शक्य नसल्यास खोटी आश्वासने इतरांना देऊ नका. 


2. वृषभ : नवीन योजनांवर भर द्याल. कौटुंबिक वातावरण आनंदी असेल. स्वतःवर पूर्ण विश्वास ठेवा. गोंधळलेल्या अवस्थेत शांत होऊन विचार करा.


3. मिथुन : रचनात्मक कार्यात दिवस जाईल. आवडीचे काम करायला मिळेल. जुन्या अडकलेल्या पैशाचे व्यवहार मार्गी लावा. 



4. कर्क : प्रलंबित कामे मार्गी लागतील. महत्त्वाच्या विषयावर चर्चा होईल. जवळच्या व्यक्तीकडून आपण फसत नाही ना याचा अंदाज घेऊन पुढे जा. 


5. सिंह : दिनक्रम व्यस्त राहू शकेल. आध्यात्मिक आवड वाढील लागेल. नोकरीत-व्यवसायात आपल्या कामाच्या संदर्भात प्रशंसा होईल. 


6. कन्या :  वादाचे प्रसंग कटाक्षाने टाळा. आत्मविश्वासाने कार्यरत राहावे. अनोळखी आजारांना वेळीच बाजूला सारा. छोटे प्रवास घडतील. 


7. तूळ :  नवीन प्रकल्पाचा शुभारंभ होऊ शकेल. जुने वाद मिटू शकतील. आपल्या छानशौकीवर आपला दिवस आनंदात घालवाल. 


8. वृश्चिक : सुख, शांतता अनुभवाल. नोकरदार वर्गाला उत्तम दिवस. सामाजिक क्षेत्रात उत्तम अधिकार प्राप्त होतील. भागीदारीत योग्य मोबदला पदरात पडेल. 



9. धनु : सावधगिरी बाळगून व्यवहार करावेत. उत्तम संधी उपलब्ध होतील. संधीचे सोने करणे आपल्या हातात राहील. आहारातील पथ्ये ना चुकता पाळा. 


10. मकर : भागीदारीतील व्यापारातून फायदा मिळेल. महत्त्वाचा निर्णय घ्यावा लागेल. जोडीदाराशी मैत्रीपूर्वक व्यवहार करा. 


11. कुंभ : आरोग्याच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करू नये. वेळीच वैद्यकीय सल्ला घेणे हिताचे ठरेल. पथ्यपाणी, औषधे चुकवू नयेत. 



12. मीन : धैर्य, संयमाने परिस्थिती हाताळावी. गरजूंना प्राधान्याने मदत करावी. वाट पाहात असलेले निर्णयाचे उत्तर मिळेल. 



आजचे राशिभविष्य; 30 नोव्हेंबर 2020


1. मेष : जोडीदाराचे सहकार्य लाभेल. वैवाहिक सौख्यात वाढ होईल. दिवस उत्तम रित्या व्यतीत कराल. व्यावसायिक क्षेत्रात ठाम रहा.


2. वृषभ : अधिकारी वर्गाकडून कौतुक केले जाईल. अती विचार करू नका. प्रिय व्यक्तीकडून भेट मिळेल. जोडीदाराची प्रगती दिसून येईल.


3. मिथुन : कामाच्या शैलीत बदल करावा लागेल. विद्यार्थ्यानी अभ्यासावर लक्ष केन्द्रित करावे. यश मिळवण्यासाठी कठोर परिश्रम घ्यावे लागतील. 



4. कर्क : राजकीय क्षेत्रातील व्यक्तींना फलदायी दिवस. घरासाठी आवर्जून काही गोष्टी कराल. खर्चाचा आकडा वाढता राहील. 


5. सिंह : विद्यार्थ्यांना अपेक्षित यश मिळेल. लोकांचा विश्वास संपादन कराल. संपूर्ण विचार केल्याशिवाय वचन देऊ नका. कलेतून चांगला लाभ होईल.


6. कन्या : कौटुंबिक वातावरणात अधिक रमाल. समस्यांचे निराकरण होईल. लोकांकडून चांगल्या कामाची प्रशंसा होईल. 


7. तूळ : आध्यात्मिक आवड वाढीस लागेल. उगाच डोक्यात राग घालून घेऊ नका. कौटुंबिक खर्चाचा ताळमेळ घालावा लागेल. 



8. वृश्चिक : दिवस धावपळीत जाईल. परंतु केलेल्या कामातून समाधान मिळेल. संमिश्र घटनांचा दिवस. क्षुल्लक समस्येतून मार्ग निघेल.


9. धनु : कार्यालयीन ठिकाणी उत्तम सहकार्य मिळेल. आर्थिक स्थिती सुधारेल. प्रिय व्यक्तीकडून भेट मिळेल. जुन्या गैरसमजुती दूर होतील. 


10. मकर : दिवसाची सुरवात उत्साहात कराल. प्रलंबित कामे मार्गी लावाल. कामा व्यतिरिक्त इतर गोष्टींकडे लक्ष देऊ नये. भावंडांशी मतभेद संभवतात. 


11. कुंभ : विरोधकांकडे दुर्लक्ष कराल. जोडीदाराच्या भावना समजून घ्याव्यात. अती तिखट पदार्थ खाऊ नयेत. उत्तम वाहन सौख्य लाभेल. 


12. मीन : मनातील गैरसमज दूर करावेत. कौटुंबिक वातावरण प्रसन्न राहील. आर्थिक स्थिती सुधारण्याचे प्रयत्न यश देतील. 






💁‍♂ आजचे राशिभविष्य; 11 नोव्हेंबर 2020


1. मेष : विद्यार्थ्यांना नवीन स्पर्धा परीक्षांसाठी उत्तम काळ. पैशाचा वापर विचारपूर्वक करा. वरिष्ठ अधिकाऱ्याच्या हस्तक्षेपामुळे कार्यक्षेत्रातील समस्या दूर होऊ शकतील.

2. वृषभ :  घरातील कामांचा बोजा वाढेल. नातेवाईक, मित्र यांच्याकडून सर्व अपेक्षा पूर्ण होतील त्याची खात्री बाळगू नका. सुख, सुविधा वृद्धिंगत होतील. 

3. मिथुन : रागावर नियंत्रण ठेवावे. विरोधकांच्या कारवायांकडे दुर्लक्ष करू नका. खर्चात वाढ होऊ शकते. दिवसाच्या उत्तरार्धात मनोबल वाढेल. 

4. कर्क : भावंडांची मदत मोलाची ठरू शकेल. मुलांकडून सुखद वार्ता मिळतील. कौटुंबिक वातावरण आनंदी व उत्साही असेल. जोडीदाराच्या मताचा आदर करावा.

5. सिंह : अधिकारी वर्गाकडून उत्तम सहकार्य लाभेल. दिवसाचा उत्तरार्ध कुटुंबासोबत व्यतीत कराल. रचनात्मक कामात गती मिळेल. 

6. कन्या : कुटुंबासोबत उत्तम वेळ व्यतीत कराल. गुंतवणुकीतून लाभ मिळू शकतील. हाती घेतलेली कामे एकाग्रतेने पार पाडावीत. अनावश्यक खर्च टाळावेत. 

7. तूळ : नशिबाची साथ मिळेल. हाती घेतलेल्या कामात यश मिळेल. कार्यक्षेत्रात वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून आपल्या मताची दखल घेतली जाईल.

8. वृश्चिक : आहारावर योग्य नियंत्रण ठेवावे. जोडीदाराचे सहकार्य आणि सानिध्य लाभेल. नवीन कार्यारंभास अनुकूल काळ.

9. धनु : छोटे प्रवास घडतील. घरामध्ये अतिवाद टाळा. परदेशात जाऊ इच्छिणाऱ्यांसाठी अनुकूल कालावधी. जोखीम पत्करून केलेली गुंतवणूक लाभदायक ठरेल. 

10. *मकर* : वाहन चालवताना सावधगिरी बाळगावी. व्यापारातील भागीदारीत काही ना काही समस्या उद्भवू शकतील. आर्थिक स्थिती ठीक राहील.

11. *कुंभ* : व्यवसायातील प्रकल्पातून सकारात्मक परिणाम दिसतील. कुटुंबातील सदस्यांकडून शुभवार्ता मिळतील. आर्थिक आघाडी उत्तम असेल.

12. *मीन* : आजार अंगावर काढू नका. नोकरी, व्यवसायात हव्या त्या हलचाली घडतील. प्रतिष्ठीत लोकांच्या संपर्कात याल. परदेशातील कार्याला गती मिळेल. 

1. मेष : परदेशात जाऊ इच्छिणाऱ्यांसाठी उत्तम कालावधी. मिळकतीत वाढ संभवते. आर्थिक व्यवहार करताना सावधगिरी बाळगावी. 

2. वृषभ : व्यापारी वर्गासाठी उत्तम दिवस. वडिलांचे मार्गदर्शन मोलाचे ठरेल. वाहन सुख मिळेल. खर्चात वाढ संभवते. भावंडांचे संपूर्ण सहकार्य लाभेल.

3. मिथुन : मुलांसोबत उत्तम संवाद घडेल. सामाजिक क्षेत्रात अधिकार मिळतील. दिनक्रम व्यस्त राहू शकेल. कार्यक्षेत्रात धावपळ करावी लागेल.


4. कर्क : आपल्या बोलण्याने लोकांची मने जिंकाल. अपेक्षित प्रतिसाद मिळेल. गुंतवणुकीतून चांगले लाभ मिळू शकतील. 

5. सिंह : कामामध्ये स्वतःला झोकून द्या. दिवस समाधानी जाईल. व्यवसायिकांना भागीदारीतून लाभ मिळू शकतील. आपल्या कार्यकौशल्याचे कौतुक केले जाईल. 

6. कन्या : कामाच्या ठिकाणी अधिक स्पष्ट बोला. आपल्याबद्दल गैरसमज निर्माण होऊ देऊ नका. कोषवृद्धीचे योग जुळून येऊ शकतील. पराक्रम वाढेल. 

7. तूळ : अनेक दिवसांपासून प्रलंबित वा बंद पडलेली कामे मार्गी लागतील. विद्यार्थ्यांना अपेक्षित यश प्राप्तीसाठी अधिक मेहनत, परिश्रम घ्यावे लागतील. 

8. वृश्चिक : नोकरीमध्ये शांत राहून काम करा. लोकांच्या उपयोगी पडाल. कोणत्याही वादापासून दूर राहावे. 


9. धनु : विद्यार्थ्यांचे उच्च शिक्षणासाठीचे मार्ग प्रशस्त होतील. सासरच्या मंडळींचे सहकार्य मिळेल. आध्यात्मिक आवड वाढीस लागेल. 

10. मकर : अचानक धनलाभ संभवतो. आपल्या आक्रमकतेला थोडा आवर घाला. दिनक्रम व्यस्त राहू शकेल. आरोग्याची विशेष काळजी घ्यावी. 

11. कुंभ : जोडीदाराकडून लाभ होईल. भ्रामक कल्पनेतून बाहेर पडा. राजकीय क्षेत्रातील व्यक्तींना प्रगतीच्या विशेष संधी उपलब्ध होऊ शकतील. सामाजिक प्रतिष्ठा वाढेल. 

12. मीन : करिअरमध्ये प्रगतीचे योग जुळून येऊ शकतील. विद्यार्थ्यांना यशकारक दिवस. भावंडांशी असलेले नाते दृढ होईल.








आजचे राशिभविष्य; 11 नोव्हेंबर 2020


1. मेष : स्वप्नाळू वृत्तीतून बाहेर या. एखादी दिलासादायक घटना घडेल. भाग्याची साथ लाभेल. आर्थिक घडी सुधारेल.


2. वृषभ : छोट्या आजारांकडे दुर्लक्ष करू नका. उपयोगी वस्तूंची खरेदी केली जाईल. मानसिक प्रसन्नता लाभेल. 


3. मिथुन :  कौटुंबिक वातावरण चांगले राहील. विक्षिप्त लोकांपासून दूर रहा. वेळेबरोबर चालावे लागेल. प्रगतीला चांगला वाव मिळेल.


4. कर्क : गणेशाची आराधना करावी. हस्त कौशल्यासाठी वेळ काढावा. करियर विषयी चिंता वाटू लागेल. आपल्याच विचारात मग्न राहाल.



5. सिंह : हवी असलेली उत्तरे मिळतील. व्यवसायिकांनी सतर्क राहावे. कामाच्या स्वरुपात काही बदल करून पहावेत. प्रयत्नांची कास सोडू नये.


6. कन्या : जोडीदाराशी मतभेद टाळा. धावपळीचा दिवस. मात्र धावपळ लाभदायक ठरेल. कौटुंबिक खर्चाचा ताळमेळ घालावा.


7. तूळ : मनातील संभ्रम दूर सारावा. उगाचच एखादी चिंता सातवेल. मानसिक दुर्बलता टाळावी. हित शत्रुंवर लक्ष ठेवावे.


8. वृश्चिक : सामाजिक कामात मदत नोंदवाल. कर्तुत्वाला वाव मिळेल. उगाच लपवा छपवी करू नका. बौद्धिक ताण जाणवेल.



9. धनु : भागीदारीत विचारपूर्वक गुंतवणूक करावी. जुन्या गोष्टी फायदेशीर ठरू शकतात. जुनी येणी प्राप्त होतील. 


10. मकर :  कष्टाला मागे पडू नका. धार्मिक कामात सहभागी होण्याची संधी मिळेल. जोडीदाराचा प्रेमळ सहवास मिळेल. मित्रांसोबत वेळ घालवाल.


11. कुंभ : अधिकार्‍यांचा पाठिंबा मिळवाल. आध्यात्मिक आवड वाढीस लागेल. वेळेचा सदुपयोग करावा.


12. मीन : आहारात अति तिखट पदार्थ टाळावेत. प्रगतीच्या दृष्टीने पाऊल पुढे टाकाल. वादाच्या मुद्यात अडकू नका. व्यावसायिक स्थैर्याकडे लक्ष द्यावे.





आजचे राशिभविष्य; 08 नोव्हेंबर 2020

1. मेष : भौतिक सुखाचा आनंद घ्याल. एखाद्या गोष्टीकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदला. गरजूंना मदत कराल. आध्यात्मिक आवड वाढीस लागेल.


2. वृषभ : कोणतेही वचन देताना सावध रहा. अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवावे. बचतीकडे लक्ष द्यावे. नवीन योजनांवर लक्ष केन्द्रित करावे.


3. मिथुन : निर्णय तुमच्या बाजूचा असेल. मुलांच्या काही बाबी गांभीर्याने घ्या. व्यवसईकांनी संधीचा लाभ घ्यावा. ज्येष्ठ बंधूंचा पाठिंबा मिळेल.


4. कर्क : दिवस कलासक्त असेल. वरिष्ठांना खुश कराल. मित्रांविषयी गैरसमज होऊ शकतात. काही अनपेक्षित बदल दिसून येतील.


5. सिंह : अधिकाराची अंमलबाजावणी करावी. वैचारिक स्थिरता ठेवावी. पायाची दुखणी संभवतात. विद्यार्थांचे प्रश्न सुटतील.


6. कन्या : मनातील इच्छा पूर्ण कराल. सर्व गोष्टीत आनंद वाटेल. बोलतांना सांभाळून शब्द वापरा. नातेवाईकांना नाराज करू नका.


7. तूळ : इतरांच्या बाजूचा देखील विचार करावा. वागण्यातून अति स्पष्टता दर्शवू नका. कौटुंबिक बाबी देखील विचारात घ्याव्यात. कामाची धांदल राहील.

8. वृश्चिक : मैत्रित गैरसमज होण्याची शक्यता. डोकेदुखीचा त्रास संभवतो. पुढील गोष्टींचा अंदाज बांधावा. कौटुंबिक जबाबदारीत वाढ होईल.



9. धनु : संभ्रमित असताना निर्णय घेऊ नका. दिवस मध्यम फलदायी. वैचारिक स्थिरता ठेवावी. नियमांना तडा जाऊ देऊ नका.


10. मकर : चालढकल करू नका. जोडीदाराची उत्तम साथ लाभेल. जुन्या गोष्टी आठवत बसू नका. चारचौघात कौतुक होईल.


11. कुंभ : बोलतांना आपले मत शांतपणे मांडा. नवीन उत्पादने घेऊ शकाल. नोकरीच्या संधी उपलब्ध होतील. सरकारी योजनांचा लाभ घ्या.


12. मीन : अतिघाईत निर्णय घेऊ नका. रेस, जुगार यातून लाभ संभवतो. आरामाची इच्छा पूर्णत्वास जाईल. व्यावसायिक विकास शक्य होईल.





💁‍♂ आजचे राशिभविष्य; 07 नोव्हेंबर 2020

1. मेष : धार्मिक ग्रंथ वाचनात वेळ घालवाल. वरिष्ठांशी जुळवून घ्यावे लागेल. रागावर नियंत्रण ठेवावे. कामावर लक्ष केन्द्रित करावे.


2. वृषभ : अति विचार करू नयेत. घरासाठी नवीन खरेदी केली जाईल. व्यापारात काही नवीन सुविधा कराल. जमिनीच्या कामातून लाभ संभवतो.


3. मिथुन : आपल्या कामात हुशारी दाखवावी. दिवसाच्या सुरूवातीस काही लाभ होतील. काही चांगले बदल अनुभवास येतील. 


4. कर्क : वरिष्ठांच्या आज्ञेचे तंतोतंत पालन करावे. दिवसभर आत्ममग्न राहाल. टीकेकडे फार लक्ष देऊ नये. घरातील ज्येष्ठांचा सल्ला घ्यावा.


5. सिंह : अपेक्षित उत्तराची वाट पहाल. संमिश्र घटनांचा दिवस. छुप्या शत्रूपासून सावध राहावे. अनोळखी लोकांशी व्यवहार करू नयेत.


6. कन्या : गुंतवणुकीच्या बाबतीत सावध रहा. जोडीदाराचे सहकार्य घ्याल. स्वत:साठी थोडा वेळ काढावा. कौटुंबिक खर्चात वाढ संभवते.


7. तूळ : काही कामे उगाचच अडकून पडल्यासारखी वाटू शकतात. डोकेदुखीचा त्रास संभवतो. टाकलेले पाऊल मागे घेऊ नका.


8. वृश्चिक : रखडलेल्या गोष्टी पुन्हा चालू होतील. काहीतरी नवीन करण्याचा विचार कराल. वैचारिक गुंतागुंत वाढवू नका. 


9. धनु : जोडीदाराची उत्तम साथ मिळेल. नवीन काहीतरी शिकण्याची संधी मिळेल. परोपकाराचे महत्त्व लक्षात घ्याल. इतरांच्या आनंदात आनंद मानाल.


10. मकर : भावंडांशी मतभेद संभावतात. सासरच्या मंडळींकडून मदत मिळेल. प्रलंबित कामे अडकून पडू देऊ नका. 


11. कुंभ : जुन्या गोष्टी सोडून द्याव्यात. बोलतांना सारासार विचार करावा. गुंतवणूक करताना फसवणुकीपासून सावध राहावे. जुगारातून लाभ संभवतो.


12. मीन : जोडीदाराच्या मताचा अवश्य विचार करावा. कामात गोंधळ उडवून घेऊ नका. घरातील वातावरण खेळकर राहील. 










💁‍♂ आजचे राशिभविष्य; 06 नोव्हेंबर 2020

1. मेष : कोणत्याही व्यवहारात गाफील राहू नका. सामाजिक कार्य मनोभावे करा. आजचा दिवस काहीसा आव्हानात्मक असेल. 


2. वृषभ : मुलांबरोबर चांगला वेळ घालवाल. व्यवसायात नवीन संधी प्राप्त होतील. आजचा दिवस सामान्य असेल. बौद्धिक क्षेत्रात असलेल्या व्यक्तींना यशप्राप्ती होईल. 


3. मिथुन : पैशाचे प्रश्न तात्पुरते सुटतील. स्वतःवर पूर्ण विश्वास ठेवा. प्रतिस्पर्धी पुढे जाण्याचा प्रयत्न करतील. 


4. कर्क : कोणाकडून फसगत होऊ देऊ नका. लोकांसमोर आपले विचार ठाम मांडा. आजचा दिवस शुभ असेल. चांगल्या कामांकडे कल राहील. 


5. सिंह : नोकरीत अनपेक्षित गोष्टींना सामोरे जावे लागेल. आपले कार्य पूर्ण होईल. आजचा दिवस उत्तम असेल. भाग्याची योग्य साथ मिळेल. 


6. कन्या : दिवसभरात छोटे प्रवास घडतील. प्रतिस्पर्ध्याला आक्रमक बनवू नका. आजचा दिवस शुभ असेल. मन प्रसन्न राहील. 


7. तूळ : आपला करारीपणा आपल्याच उपयोगात येईल. बोलताना शब्दांचा वापर जपून करा. भाग्याची भक्कम साथ लाभेल. 


8. वृश्चिक : आपला सल्ला लोकांना उपयोगी पडेल. हितचिंतकांच्या संपर्कात याल. आजचा दिवस काहीसा आव्हानात्मक असू शकेल.


9. धनु : नोकरी व्यवसायात लक्ष देऊन काम करा. हितशत्रूंच्या कारवायांकडे लक्ष ठेवावे लागेल. राजकीय क्षेत्रातील व्यक्तींना लाभदायक दिवस. 


10. मकर : आपला पराक्रम सिद्ध करून दाखवा. विशेष फलदायक दिवस. भाग्य वृद्धिंगत होईल. स्पर्धेत विजय प्राप्त करू शकाल. 


11. कुंभ : घरातील वातावरण शांत ठेवा. नवीन संधी प्राप्त होतील. राशीस्वामी शनीची कृपादृष्टी लाभेल. आपण घेत असलेल्या मेहनतीचे चीज होईल. 


12. मीन : वाट पहात असलेल्या उत्तराची अपेक्षापूर्ती होईल. जुन्या मित्रांच्या-नातेवाईकांच्या संपर्कात याल. आजचा दिवस शुभ असेल. 








आजचे राशिभविष्य; 05 नोव्हेंबर 2020


1. मेष : जबाबदाऱ्यांमध्ये वाढ होईल. मेहनत व परिश्रम अधिक करावी लागेल. मात्र, कष्टाचे चीज होऊन त्याचा योग्य मोबदला मिळेल. 


2. वृषभ : मुलांकडून आनंदवार्ता मिळतील. मनोबल उंचावेल. भाग्योदयाचे योग. आपल्या कामावर लक्ष केंद्रीत करून कार्यरत राहावे.


3. मिथुन : काही समस्यांचा सामना करावा लागेल. केवळ आपल्या कामावर लक्ष केंद्रीत करावे. हळूहळू यशाचे मार्ग प्रशस्त होतील. 


4. कर्क : आपण घेतलेले निर्णय लाभदायक ठरतील. विवाहाची बोलणी पुढे सरकतील. जनसंपर्कात भर पडेल. 


5. सिंह : विरोधकांच्या कारवाया निष्प्रभ ठरतील. चांगल्या कामासाठी पैसे खर्च झाल्याने आनंद होईल. चर्चेच्या माध्यमातून मतभेद संपुष्टात येऊ शकतील. 


6. कन्या : भाग्याची भक्कम साथ लाभेल. ज्येष्ठांची सेवा केल्याचे पुण्यप्राप्त होईल. दाम्पत्य जीवन सुखमय असेल. मुलांकडून शुभवार्ता मिळतील.


7. तूळ : अधिकची मेहनत घ्यावी लागेल. मात्र, त्याचा दुपटीने लाभ मिळू शकेल. खर्चात वाढ संभवते. हितशत्रूंच्या कारवायांवर लक्ष ठेवावे लागेल. 


8. वृश्चिक : नवीन प्रकल्प मिळू शकतील. भाग्याची भक्कम साथ लाभेल. प्रलंबित कामे मार्गी लागतील. वरिष्ठ व्यक्तींकडून कौतुक, प्रशंसा होईल.


9. धनु : विरोधक पराभूत होतील. मन प्रसन्न राहील. दिवसाचा उत्तरार्ध उत्तम असेल. चांगल्या गोष्टींसाठी पैसे खर्च होतील.


10. मकर : ज्येष्ठ व तज्ज्ञ व्यक्तींच्या गाठी-भेटीचे योग. मन प्रसन्न राहील. मालमत्ते विषयीचा वाद संपुष्टात येऊ शकेल. 


11. कुंभ : धनलाभाचे योग आहेत. ज्येष्ठ महिलेचे शुभाशिर्वाद प्राप्त होऊ शकतील. प्रगतीचे मार्ग प्रशस्त होतील. रागावर नियंत्रण ठेवावे. 


12. मीन : भाग्याची साथ लाभेल. मिळकतीचे नवे स्रोत उपलब्ध होऊ शकतील. व्यवसायातील गुंतवणूक भविष्यात लाभदायक ठरेल. 









आजचे राशिभविष्य; 04 नोव्हेंबर 2020


1. मेष : आंधळा विश्वास ठेऊ नका. कुटुंबासाठी काही विशेष गोष्टी कराल. आवडीच्या पदार्थांवर ताव माराल. कौटुंबिक सौख्य उत्तम राहील.


2. वृषभ : आवडत्या गोष्टी करायला मिळाल्याने आपण खुश असाल. सर्वांना प्रेमाने जिंकून घ्याल. प्रेमातील लोकांनी सबुरीने घ्यावे. 


3. मिथुन : कलात्मक गोष्टीत आनंद वाटेल. सकारात्मक दृष्टीकोन ठेवा. बदल समजून घेऊन कामात हात घाला.



4. कर्क : मनातील इच्छा पूर्ण करून घ्याल. वरिष्ठांना नाराज करू नका. घरातील ज्येष्ठ मंडळींचे विचार विरोधी वाटू शकतात. 


5. सिंह : कामानिमित्त प्रवास घडेल. हातातील अधिकारचे बळ दाखवा. हातापायला किरकोळ इजा संभवते.


6. कन्या : आहाराची पथ्ये पाळावीत. चटकन प्रतिक्रिया दर्शवू नका. वादाचे प्रसंग टाळावेत. आत्मविश्वास कमी पडू देऊ नये. 



7. तूळ : कामाच्या ठिकाणी तणाव जाणवू शकतो. संयमाने कामे करावी लागतील. कौटुंबिक स्थिती सलोख्याने हाताळावी. 


8. वृश्चिक : वरिष्ठांच्या मतानेच चालावे. झोपेची तक्रार जाणवेल. काही कामे बौद्धिक कस पाहू शकतात. मैत्रीच्या बाबतीत साशंकता जाणवेल.


9. धनु : कामाच्या ठिकाणी दिवस चांगला जाईल. नातेवाईकांना मदत कराल. रागावर नियंत्रण ठेवावे लागेल. कामाच्या स्वरूपाचा नीट अंदाज घ्यावा.



10. मकर : धार्मिक गोष्टीत मन रमेल. प्रामाणिकपणे कार्यरत राहाल. प्रवास करताना सावधगिरी बाळगावी. वाहन वेगावर नियंत्रण ठेवावे.


11. कुंभ : कौटुंबिक कामात आनंद मानाल. गुंतवणूक करताना सावधानता बाळगावी. घाईने निर्णय घेऊ नयेत. तिखट शब्दांचा वापर टाळावा.


12. मीन : आततायीपणा करू नका. चटकन कोणत्याही निर्णयावर येऊ नका. अडचणीतील लोकांना मदत कराल. धैर्य व संयम आवश्यक.

















आजचे राशिभविष्य; 03 नोव्हेंबर 2020


1. मेष : सहजासहजी समोरच्यावर विश्वास ठेऊ नका. उत्तम कौटुंबिक सौख्य लाभेल. खाण्यापिण्याची आवड पूर्ण होईल. 


2. वृषभ : वैचारिक गुंतागुंत वाढवू नका. कोणत्याही दबावाखाली निर्णय घेऊ नका. नवीन योजनेवर काम करण्यावर भर द्या. 


3. मिथुन : आपल्या आक्रमकतेला आळा घाला. योग्य नियोजनावर भर द्या. वैचारिक गुंतागुंत वाढवू नका. 

----------------------
हे भर्ती पन पहा👇
----------------------

4. कर्क : मित्रांकडून उधारी वसूल होईल. हातातील काम मन लावून करा. एखाद्या महत्त्वाच्या विषयावर चर्चा कराल. 


5. सिंह : दिनक्रम व्यस्त राहील. कार्यालयीन कामे सुरळीत पार पडतील. सूर्योपासना उपयुक्त ठरेल. घरगुती वातावरण शांत राहील.


6. कन्या : वादाचे प्रसंग टाळावेत. आत्मविश्वासाने कार्यरत रहा. प्रयत्नात कसूर करू नका. दिवसाचा उत्तरार्ध चांगला जाईल.


7. तूळ : नवीन कामात तडजोड करू नका. अचानक धनलाभ संभवतो. हाताखालील लोकांवर विसंबून राहू नका. 


8. वृश्चिक : वरिष्ठांच्या मर्जीनेच काम करा. लाभाची संधी सोडू नका. केवळ कामावर लक्ष केन्द्रित करावे. नवीन गोष्टी आत्मसात कराव्यात.



9. धनु : कामाच्या ठिकाणी दिवस चांगला जाईल. एक छोटासा बदल लाभदायक ठरेल. नवीन संधी उपलब्ध होतील. 


10. मकर : प्रत्येक गोष्टीत स्पष्टता बाळगावी. निर्णय घेताना हवे तर वेळ मागून घ्या. जुगारातून लाभ संभवतो. 


11. कुंभ : लोक तुमच्या मताचा विचार करतील. मोसमी आजरांकडे दुर्लक्ष करू नका. आहारवर नियंत्रण ठेवावे. व्यापारी वर्गाला दिवस चांगला जाईल.


12. मीन : बोलताना सारासार विचार करावा. जोखीम पत्करावी लागेल. बुद्धीचा सुयोग्य वापर करावा. अडचणीत असलेल्यांना मदत कराल.