SSC Examination Timetable 2020 – New Timetable Published – स्टाफ सिलेक्शन कमिशन परीक्षा वेळापत्रक प्रकाशित – कर्मचारी भरती आयोगाच्या उमेदवारांना दिलासा देणारी बातमी आहे. करोना विषाणूच्या संक्रमणामुळे निर्माण झालेल्या स्थितीच्या पार्श्वभूमीवर स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या परीक्षा लांबणीवर पडल्या होत्या. या परीक्षांचे वेळापत्रक प्रकाशित करण्यात आले आहे.
कंबाइंड हायर सेकंडरी लेवल एज्युकेशन (टिअर १) (ज्यांना परीक्षा देता आली नव्हती त्या उमेदवारांसाठी) – १७ ऑगस्ट २०२० ते २१ ऑगस्ट २०२० आणि २४ ऑगस्ट ते २७ ऑगस्ट २०२०
- ज्युनिअर इंजिनीअर पेपर १ २०१९ – १ सप्टें २०२० ते ४ सप्टेंबर २०२०
- सिलेक्शन पोस्ट एक्झामिनेशन – ७ सप्टेंबर २०२० ते ९ सप्टेंबर २०२०
- CAPF आणि दिल्ली पोलीस दलातील सब इन्स्पेक्टर पेपर १ – २९ सप्टेंबर २०२० ते १ ऑक्टोबर २०२० आणि ५ ऑक्टोबर २०२०
- ज्युनिअर हिंदी ट्रांस्लेटर, ज्युनिअर ट्रान्स्लेटर, सीनियर हिंदी ट्रान्स्लेटर आणि हिंदी प्राध्यापक परीक्षा पेपर १ – ६ ऑक्टोबर २०२०
- सीजीएल (टिअर – २) – १४ ऑक्टोबर २०२० ते १७ ऑक्टोबर २०२०
परीक्षेचे वेळापत्रक हे तत्कालीन परिस्थितीवर अवलंबून असेल. तसेच राज्य आणि केंद्र सरकारतर्फे वेळोवेळी येत असलेल्या निर्देशांवरही या परीक्षांचे आयोजन अवलंबून असेल. त्यामुळे उमेदवारांनी अपडेट्ससाठी सातत्याने आयोगाच्या संकेतस्थळावर जाऊन ताजी माहिती घ्यावी, असं आवाहन आयोगाने केलं आहे.
एसएससी सदस्य राजीव श्रीवास्तव यांनी सांगितले की, ‘स्टाफ सिलेक्शन परीक्षांना होणाऱ्या विलंबाच मुख्य कारण म्हणजे करोना महामारीमुळे उद्भवलेली स्थिती. अनेक परीक्षांचे मूल्यांकन अद्याप बाकी आहे. एसएससी ते पूर्ण करण्याच्या मागे लागले आहे. १ जून रोजी परीक्षेच्या निकालाच्या तारखेसंदर्भात बैठक होणार असून जूनच्या पहिल्या आठवड्यात निकाल जाहीर केला जाईल.’
ते म्हणाले, ‘परीक्षांचे निकाल लावण्यासाठी तीन महिन्यांचा कालावधी लागू शकतो, कारण बरेच परीक्षक कार्यालयात पोहोचू शकत नाहीएत. मूल्यांकनाचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी यामुळे अडचण येत आहे.’
एसएससीच्या अनेक परीक्षांचे निकाल प्रलंबित आहेत. लाखो उमेदवार अनेक महिन्यांपासून या परीक्षांच्या निकालाची प्रतीक्षा करत आहेत. एसएससीच्या MTS 2019 पेपर 2 आणि CGL 2018 टायर 3 चे उमेदवार आधीच निकालावर नाराज आहेत. कारण या उमेदवारांना UFM इमॅजिनरीमुळे अपात्र ठरण्याची भीती आहे.
सीएचएसएल 2018 च्या टायर 2 परीक्षेप्रमाणे या परीक्षांमध्येही उमेदवारांना पत्रलेखन होते. अनेक उमेदवारांनी पत्रात काल्पनिक पत्ता लिहिला आहे, आता त्यांना भीती वाटत आहेत की चांगला स्कोर मिळूनही या तांत्रिक चुकीमुळे ते नापास होऊ शकतात.
एसएससीच्या अधिकृत संकेतस्थळावर जारी करण्यात आलेल्या या परिपत्रकात परीक्षांच्या तारखेबद्दल माहिती देण्यात आलेली आहे. या परीक्षा पुढीलप्रमाणे आहेत – SSC CHSL 2019 टियर १ परीक्षा, SSC JE 2019 पेपर १ परीक्षा, SSC स्टेनोग्राफर ग्रेड सी आणि डी २०१९ परीक्षा आणि SSC CHSL २०१९ स्कील टेस्ट परिपत्रकात म्हटले आहे की देशातील कोविड – १९ विषाणूच्या संक्रमणाने उद्भवलेल्या स्थितीचा विचार करून आयोगाने हा निर्णय घेतला आहे की १ जून २०२० रोजी पुन्हा एकदा परिस्थितीचा आढावा घेतला जाईल. त्यानंतर आयोग भरती परीक्षांच्या नव्या वेळापत्रकाची घोषणा करेल.
परिपत्रकात स्पष्टपणे म्हटले आहे की स्टाफ सिलेक्शन कमिशन प्रलंबित परीक्षांच्या नव्या तारखांची घोषणा १ जूननंतरच करणार आहे.
0 Comments
Post a Comment