🗣️ कोरोनाचं संकट अजून टळलेलं नाही - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
Job Marathi | Update
⚡ राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज (28 जून) रोजी दुपारी दीड वाजता महाराष्ट्रातील जनतेशी संवाद साधला.
💁♂️ यावेळी त्यांनी कोकणातील परिस्थितीसोबतच राज्यातील अनलॉकबाबत आणि इतर गोष्टींवर भाष्य केलं.
🔐 राज्यात लॉकडाऊनदरम्यान, शिथिलता दिल्यामुळे कोरोनाचा कहर मोठ्या प्रमाणात वाढला. त्यामुळे लॉकडाऊनमध्ये सूट देणं योग्य नाही असं उद्धव ठाकरे म्हणाले आहे.
🧐 *मुख्यमंत्री ठाकरे यांच्या भाषणातील महत्वाचे मुद्दे*
● 1 तारखेपासून जिथे गरज आहे तिथे जास्त काळजी घ्या
● पीपीई किट आणि मास्क यांचा मुबलक साठा
● पावसाळ्यात साथीच्या रोगाविषयी खबरदारी घ्या
● शाळा कधी सुरु होणार यापेक्षा शिक्षण कसे सुरु राहणार याकडे लक्ष देऊ
● उद्योजकांनो महाराष्ट्रात या गुंतवणुक करा
● 15 दिवसात 16 हजार कोटींचे करार केले
● सर्व गणपती मंडळांनी सरकारच्या निर्णयाला पाठिंबा दिला, त्यांचेही आभार
● विठूरायाला कोरोनाचं संकट संपवण्यासाठी आणि आरोग्यदायी आयुष्य मागण्यासाठी साकडं घालणार
● अनेक ठिकाणांहून बोगस बियाणांच्या तक्रारी येत आहेत, त्याची गंभीर दखल घेण्यात आली आहे.
● हळूहळू सर्व दुकानं सुरू करण्यात आली आहे. पण कोरोनाचं संकट अजून टळलेलं नाही
● 1 जुलै पासून लॉकडाऊन संपला असं समजू नका
● 30 जूननंतर लॉकडाऊन उठणार नाही. पण अत्यंत काळजीपूर्वक गोष्टी सुरू करत आहोत.
● 30 जून पर्यंत लॉकडाऊन आहे. पण हळूहळू आपण सर्व सुरू करत आहोत.
● जीव जगवणाऱ्या डॉक्टर आणि शेतकऱ्यांना माझं वंदन
● लॉकडाऊन असताना आपण घरात बंद असलो तरी शेतकरी आपल्यासाठी उन्हात राबत आहे.
● एक जुलै रोजी डॉक्टर दिन आणि माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांचा जन्मदिन
● निसर्ग वादळाने ज्यांचं नुकसान झालं त्यासर्वांच्या पाठीशी सरकार
● आर्थिक नुकसान प्रचंड झालं आहे.
● निसर्ग चक्रिवादळात मनुष्यहानी कमीत कमी करण्यात यश
🔎 माहितीचा सार, ज्ञानाचा भांडार एका क्लिकवर, त्यासाठी आजच जॉइन करा आमचा ग्रुप
👇👇👇👇👇👇
0 Comments
Post a Comment