इंग्रजी येत नसूनही बनले लोकप्रिय 'ZOOM' अ‍ॅपचे सर्वेसर्वा, आज 48.44 हजार कोटींची संपत्ती






 कोरोना व्हायरस लॉकडाऊनमुळे वर्क फ्रॉम होम करणाऱ्यांसाठी ZOOM हे व्हिडीओ कॉन्फरन्सिंग अ‍ॅप तारणहार बनले आहे. दरम्यान या अ‍ॅपच्या सीईओंचा जीवनप्रवास थक्क करणारा आहे. कोरोना व्हायरसमुळे अनेकांना वर्क फ्रॉम होम मिळाले आहे. परिणामी या कालावधीत Zoom या व्हिडीओ कॉन्फरन्सिंग अ‍ॅपचा वापर वाढला आहे. त्यानंतर मोठ्या प्रमाणात चर्चेच आलेले नाव म्हणजे या अ‍ॅपचे सीईओ Eric Yuan. चीनमधील शानडोंग प्रांतात 1970 मध्ये एरिक यांचा जन्म झाला होता.






Shandong University of Science and Technology मधून त्यांनी त्याचं पदवीचं शिक्षण पूर्ण केले होते. त्यानंतर त्यांनी त्यांंची मायनिंग इंजिनीअरिंग डिग्री युनिव्हरसिटी ऑफ मायनिंग अँड टेक्नॉलॉजीमधून पूर्ण केली. फोर्ब्सने दिलेल्या माहितीनुसार अमेरिकेला जाण्यासाठी त्यांचा व्हिसा 8 वेळा नाकारण्यात आला होता. नवव्यांदा त्यांना यश आले. 22व्या वर्षी लग्न केल्यानंतर ते अमेरिकेला पोहोचले अमेरिकेला पोहोचल्यानंतर महत्त्वाचा प्रश्न होता तो म्हणजे भाषेचा. एरिक यांनी दिलेल्या माहितीनुसार कोडिंगमध्ये त्यांचे काम अधिक असल्याने त्यांचे इंग्रजी भाषेवर प्रभुत्त्व नव्हते. ते सांगतात की आता जी काही थोडीफार इंग्रजी येते ती मित्रांशी बोलून शिकलो आहे. त्यांनी इंग्रजीसाठी कोणतं शिक्षण घेतलेलं नाही. 1997 मध्ये एरिक WebEx नावाच्या व्हिडीओ कॉन्फरन्सिंग कंपनीमध्ये सॉफ्टवेअर इंजिनीअर म्हणून काम पाहत होते. 2007 मध्ये WebEx ने खरेदी केलेल्या Cisco Systems कंपनीमध्ये एरिक यांना डिपार्टमेंट चीफ बनवण्यात आले. 2011मध्ये त्यांनी ही कंपनी सोडली. स्वत:च काहीतरी सुरू करावं अशी कल्पना एरिक यांच्या पत्नीने त्यांना सूचवली होती. एरिक यांना कॉलेजमध्ये असताना गर्लफ्रेंडला भेटण्यासाठी जाताना 10 तासांचा प्रवास करावा लागे. त्याचवेळी तिच्याशी एका क्लिकवर बोलता यावं याकरता त्यांना व्हिडीओ कॉन्फरन्सिंगची कल्पना सुचली होती. आज तिच गर्लफ्रेंड एरिक यांची पत्नी आहे.





 वयाच्या 41 व्या वर्षी जेव्हा त्यांनी ZOOM App सुरू केले त्यावेळी त्यांनी सिलीकॉन व्हॅलीमधील अनेक कंपन्यांनी दुषणं दिली होती. मार्क झुकरबर्ग यांनी युनिव्हर्सिटीचा अभ्यासानंतर लगेचच फेसबुकची सुरूवात केली होती. त्यामुळे या वयात स्टार्टअप सुरू करणं जोखमीचं होतं ZOOMची सुरूवात झाल्यानंतर सुरूवातीचा काळ एरिक यांच्यासाठी कठीण होता. मात्र आता ते सुद्धा आंतरराष्ट्रीय बैठकांसाठी देखील ZOOM चाच वापर करतात. त्याकारता दौरा करण्याची गरज भासत नाही. आता 2020 एप्रिल महिन्यात फोर्ब्सने जारी केलेल्या यादीनुसार अब्जाधीशांच्या यादीत एरिक युआन यांचे देखील नाव आहे. फोर्ब्सनुसार त्यांची रियल टाइम नेटवर्थ 6.4 बिलियन डॉलर आहे. म्हणजेच ते 48.44 हजार कोटींचे मालक आहेत. फोर्ब्सच्या सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत ते 293 व्या स्थानावर आहेत
Download Below