मुंबई : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सायबर सुरक्षेचा आढावा घेतला. त्यानंतर त्यांनी माध्यमांसोबत संवाद साधला. सायबर गुन्हे तत्काळ उघडकीस यावेत यासाठी काही सुधारणा केल्या जातील अशी माहिती यावेळी त्यांनी दिली.
पोलिस विभागात 20 हजार पदांची भरती करण्यात येणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.
"पोलिस विभागातील भरतीबाबत या पूर्वी सात ते आठ हजार पदांच्या भरतीबाबत एक जाहीरात काढण्यात आली आहे. त्यानंतर आता आणखी 12 हजार पदांसाठीची जाहीरात लवकरात लवकर काढण्यात येईल.
या भरतीमुळे पोलिस दलाला चांगली मदत होईल. या भरतीसाठी लकरता लवकर कार्यवाही करण्यात येणार असल्याचं यावेळी दवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.
0 Comments
Post a Comment