💳 1 जानेवारी 2021 पासून सर्व चारचाकी वाहनांसाठी फास्टॅग बंधनकारक करण्यात आला आहे. रस्ते परिवहन आणि राजमार्ग मंत्रालयाकडून फास्टॅग नसणाऱ्यांकडून दुप्पट पैसे वसूल करण्याचे नोटिफिकेशन जारी करण्यात आले आहे. 


🤨 तुमच्याकडे फास्टॅग नसल्यास तुमची कार टोल पार करू शकणार नाही. मात्र एका विशेष सेवेचा वापर करून, फास्टॅग नसतानाही दुप्पट कर देण्यापासून वाचता येतं.


😀 *ही सुविधा येईल कामी :-*


💁‍♂ _जर फास्टॅग नसेल आणि तुम्हाला दुप्पट कर भरणं टाळायचं असेल तर प्रीपेड टच अँड गो कार्ड सेवा वापरावी लागेल. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण टोल प्लाझावर गर्दी कमी करण्यासाठी 1 जानेवारीपासून सर्व हायब्रीड लेनवर प्री-पेड कार्ड सेवा सुरू करण्यात येणार आहे._



↘️ *असा घ्या लाभ :-*


▪️ _गाडीवर फास्टॅग नसेल तर आपण टोल नाक्यावर पॉईंट-ऑफ-सेल्स कडून हे प्री-पेड कार्ड खरेदी करू शकता._


▪️ _प्रीपेड कार्ड फास्टॅग असल्यावरही वापरता येतं. फास्टॅग ब्लॅकलिस्ट झाल्यास किंवा फेल झाल्यास टोल कर भरण्यास या कार्डचा वापर करता येईल._

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖