कोरोना महामारीमुळे आलेल्या मरगळीला उद्योग क्षेत्राने स्थिरावत आहे. हळूहळू व्यापर जगतात उलाढालही वाढली आहे. मागणीमध्ये वाढ झाल्याने अनेक कंपन्यांनी आपल्या उत्पादनात वाढ केली आहे. मागणी वाढल्यामुळे अनेक कंपन्यांना आता मनुष्यबळ कमी पडू लागलं आहे. ही गरज लक्षात घेता अनेक ठिकाणी नोकरीच्या संधी निर्माण झाल्या आहेत.
उद्योग क्षेत्रात नावाजलेली लार्सन अँड टूब्रो (L&T) या कंपनीनेसुद्धा तरुणांना रोजगाराची मोठी संधी दिली आहे. या कंपनीकडून तब्बल 1100 इंजिनियर्सची भरती (Engineers job) करण्यात येत आहे. (Larsen and Toubro is hiring 1100 Engineer big opportunity of job) या कंपनीकडून भरती प्रक्रिया सुरु आहे.
कोरोनामुळे संसर्गाचा धोका असल्यामुळे भरती प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने राबवण्यात येत आहे. आतापर्यंत 250 इंजिनियर्सची भरती प्रक्रिया पूर्ण झाली आहे. आयआयटी मद्रास, गुवाहाटी, मुंबई, दिल्ली, रुरकी, खडगपूर, हैदराबाद या संस्थांमध्ये शिक्षण पूर्ण केलेल्या तसेच इतरही ठिकाणाहून पदवी घेतलेल्या इंजिनियर्सना एल अँड टी या कंपनीमध्ये भरती करुन घेतलं जात आहे. खूप काही शिकण्याची संधी एल अँड टी (L&T) चे व्यवस्थापकीय संचालक एस. एन. सुब्रमण्यम यांनी भरती प्रक्रियेबद्दल सांगताना, ही तरुणांसाठी चांगली संधी असल्याचं म्हटलंय. ही कंपनी राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर काम करते. त्यामुळे येथे आलेल्या इंजिनियर्सना खूप काही शिकण्याची संधी असल्याचंही ते म्हणाले.
दरवर्षी 1100 इंजिनियर्सना नोकरी ही कंपनी दरवर्षी 1100 फ्रेशर इंजिनियर्सना संधी देते. देशातील उत्तम संस्थेत शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी संधी देण्यात येते. कोरोना महामारीमुळे उद्योगक्षेत्र तोट्यात असूनसुद्धा या कंपनीकडून एवढ्या मोठ्या प्रमाणावर भरती केली जात आहे. ही सर्व प्रक्रिया ऑनलाईन पद्धातीने होत आहे.
Source-Tv9Marathi
0 Comments
Post a Comment