दिनांक ९ सप्टेंबर 2020 रोजी आयटीआय प्रवेशाच्या वेळी जोडवयाचे कागदपत्र


Searches related to iti iti admission iti admission 2020 iti courses dvet iti maharashtra iti online form 2020 iti admission online registration iti admission process iti registration

दिनांक 8 सप्टेंबर 2020 रोजी सिलेक्शन यादी लागलेली आहे. आणि दिनांक 9 सप्टेंबर 2020 रोजी प्रत्यक्ष ज्या विद्यार्थ्यांचे ज्या संस्थेमध्ये निवड झाली असेल त्याकरिता सकाळी 9 वाजेपासून प्रवेशाला सुरुवात होत होणार आहेत. त्याकरिता पूर्वतयारी म्हणून आपण खाली दिलेल्या सूचनांचे तंतोतंत पालन करावे जेणेकरून आपणास प्रवेश यावेळी कोणती अडचण जाणार नाही.


ज्या उमेदवाराची निवड औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत झाल्यास खालील कागदपत्रे दिलेल्या क्रमाने जोडून बंच तयार करावे.



बंच क्रंमाक -1

१) व्यवसाय निवड पत्र म्हणजेच (Trade allotment letter )हे तुम्ही सायबरकॅफे वरून काढून आणावेत.

२) ऑनलाइन भरलेला प्रवेश प्रिंट दिनांक 5 सप्टेंबर 2020 नंतर ची  अर्जांची प्रिंट आऊट काढून आणावे. Confirm application form print out

३) दहावीची मूळ  गुणपत्रिका 

४) शाळा सोडल्याचा दाखला (तुमच्याकडे असलेली दहावी बारावी पदवी यापैकी तुमच्याजवळ जी टीसी असेल ती मुळ ओरिजनल टीसी (ट्रान्सफर सर्टिफिकेट)




बंच क्रंमाक -२ 

खालील सर्व मूळ कागदपत्रांचा बंच तयार करून तपासण्यास द्यावा.

खालील दिलेल्या प्रमाणपत्र प्रवेश अर्ज भरताना Yes गेलेले असेल तर जोडणे आवश्यक आहे जर तुमच्या अर्जामध्ये No लिहिले असेल तर जोडण्याची आवश्यकता नाही.

१) जातीचा दाखला caste certificate 

२) उन्नत व प्रगत गटात मोडत नसल्याबाबतचे दाखला. (Non creamy layer certificate) 

३) डिफेन्स कॅटेगिरी मध्ये असल्यास प्रमाणपत्र. (Deference category certificate) 


 ४) अपंग उमेदवार असल्यास प्रमाणपत्र (Disability certificate )

५) इंटरमिजिएट ड्रॉइंग परीक्षा पास असेल तर प्रमाणपत्र (intermediate drawing certificate) 

६) NCC /MCC /scout guide certificate 

७) खेळाचे प्रमाणपत्र जिल्हास्तर /राज्यस्तर /राष्ट्रीय स्तर/ असेल तर प्रमाणपत्र जोडावे स्पोर्ट सर्टिफिकेट 

८) यापूर्वी आयटीआय केला असेल तर प्रमाणपत्र जोडावे.

९) आधार कार्ड




बंच क्रमांक -३ 

(झेरॉक्स कागदपत्रे संस्थेत जमा करावी. )


सर्व कागदपत्राचा मुळ प्रमाणपत्र बंच व  झेरॉक्स बंच प्रवेशाच्या वेळी तयार करून संस्थेत जमा करावे. 

यामध्ये विशेष सूचना खालील दिलेल्या प्रमाणपत्र प्रवेश अर्ज भरताना जर तुम्ही तुमच्या अर्जामध्ये Yes केलेली  असेल तरच जोडणे आवश्यक आहे .जर तुम्ही अर्जामध्ये No नोंद केली असेल तर जोडण्याची आवश्यकता नाही याची नोंद घ्यावी.

१) शाळा सोडल्याचा दाखला 

२ एसएससी ssc गुणपत्रिका

३) जातीचा दाखला 

४) उन्नत व प्रगत गटात मोडत नसल्याबाबतचे दाखला (Non creamy layer certificate )

५) डिफेन्स कॅटेगिरी मध्ये असल्यास प्रमाणपत्र 

६) अपंग उमेदवार असल्यास अपंग प्रमाणपत्र (Disability certificate )

७) इंटरमिजिएट ड्रॉइंग परीक्षा पास असल्यास प्रमाणपत्र  

८) NCC/ MCC /scout guide certificate 

९) खेळाचे प्रमाणपत्र जिल्हास्तर /राज्यस्तर/ राष्ट्रीयस्तरअसेल तर प्रमाणपत्र जोडावे. (Sport certificate district state /national level )

१०) यापूर्वी आयटीआय अभ्यासक्रम पूर्ण केला असेल तर प्रमाणपत्र जोडावे.

११) आधार कार्ड आणि आधार कार्ड वर रजिस्ट्रेशन नंबर टाकावा निवड झालेल्या व्यवसायाचे नाव तसेच ब्लड ग्रुप लिहावे.

१२) पासपोर्ट साईज दोन रंगीत फोटो जमा करावेत.