इन्स्टंट मेसेजिंग सर्व्हिस देणारे भारतामध्ये त्यांची सुविधा विस्तारण्याच्या तयारीत आहे. वृत्तसंस्था पीटीआयने दिलेल्या माहितीनुसार व्हॉट्सअ‍ॅप विमा, मायक्रो फायनान्स आणि पेन्शनसारख्या सुविधा लवकरच सुरू करू शकते. याकरता पायलट प्रोजेक्ट देखील सुरू होऊ शकतो. यामध्ये हे App फायनान्शिअल प्रोडक्ट्सपर्यंत लोकांची पोहोच सोपी करण्यासाठी बँका आणि वित्तीय संस्थांबरोबर भादीदारीचे काम करेल. कंपनीचे भारतातील प्रमुख अभिजीत बोस यांनी बुधवारी याबाबत माहिती दिली.
इन्स्टंट मेसेजिंग सर्व्हिस देणारे भारतामध्ये त्यांची सुविधा विस्तारण्याच्या तयारीत आहे. वृत्तसंस्था पीटीआयने दिलेल्या माहितीनुसार व्हॉट्सअ‍ॅप विमा, मायक्रो फायनान्स आणि पेन्शनसारख्या सुविधा लवकरच सुरू करू शकते. याकरता पायलट प्रोजेक्ट देखील सुरू होऊ शकतो. यामध्ये हे App फायनान्शिअल प्रोडक्ट्सपर्यंत लोकांची पोहोच सोपी करण्यासाठी बँका आणि वित्तीय संस्थांबरोबर भादीदारीचे काम करेल. कंपनीचे भारतातील प्रमुख अभिजीत बोस यांनी बुधवारी याबाबत माहिती दिली.    WhatsApp    [हे वाचा- इंग्रजी येत नसूनही बनले लोकप्रिय 'ZOOM' अ‍ॅपचे सर्वेसर्वा, आज 48.44 हजार कोटींची संपत्ती]   बोस यांनी 'ग्लोबल फिनटेक फेस्ट'मध्ये अशी माहिती दिली की, कंपनी फायनान्शिअल प्रोडक्ट्स संदर्भातील समस्यांच्या समाधानासाठी कंपनी विचार करत आहे. त्याकरता संभावित समाधानांचे परीक्षण करण्यासाठी वेगवेगळ्या नवीन उपक्रमांचे देखील कंपनी समर्थन करेल. बोस यांनी माहिती दिली की, त्यांची कंपनी बँकिंग भागीदारांबरोबर त्यांची डिजिटल उपस्थिती चांगली बनवण्यासाठी काम करत आहे. देशातील विविध भागामध्ये आर्थिक पोहोच वाढवण्यासाठी एक वर्षापेक्षा अधिक काळासाठी कंपनी काम करत आहे.    WhatsApp Pay पेमेंट सर्व्हिस    WhatsApp त्यांच्या पेमेंट सर्व्हिस WhatsApp Pay चे परीक्षण भारतात 2018 पासून सुरू केले आहे. ही यूपीआय आधारित सर्व्हिस युजर्सना रक्कम पाठवणे आणि प्राप्त करण्याची सुविधा उपलब्ध करून देते. यांची स्पर्धा भारतात सॉफ्टबँक समर्थित पेटीएम, फ्लिपकार्टचे फोनपे आणि गूगल पे बरोबर आहे. नियामक अडचणींमुळे कंपनीला ही सेवा अद्याप भारतात पूर्णपणे लागू करता आली नाही. बोस म्हणाले, येत्या काही वर्षांत बँकिंग सेवासुलभ आणि विस्तारित करण्यासाठी (विशेषत: ग्रामीण आणि निम्न उत्पन्न वर्गात) आम्हाला अधिक बँकांशी जोडले जायचे आहे.      आम्हाला आरबीआयने नमूद केलेल्या मूलभूत आर्थिक सेवांसारख्या इतर उत्पादनांमध्ये आपला उपयोग वाढवायचा आहे. आम्ही याची सुरुवात मायक्रो पेन्शन आणि विम्याने करू इच्छितो. बोस म्हणाले की, येत्या दोन-तीन वर्षात असंघटित क्षेत्रातील अल्प वेतनधारक कामगारांपर्यंत देखील विमा, मायक्रोक्रेडिट आणि पेन्शन या तीन उत्पादनांची मदत पोहोचवायची आहे.        [हे वाचा-👮🏻 10 हजार पोलिस शिपायांची भरती होणार]
WhatsApp

[हे वाचा- इंग्रजी येत नसूनही बनले लोकप्रिय 'ZOOM' अ‍ॅपचे सर्वेसर्वा, आज 48.44 हजार कोटींची संपत्ती]


बोस यांनी 'ग्लोबल फिनटेक फेस्ट'मध्ये अशी माहिती दिली की, कंपनी फायनान्शिअल प्रोडक्ट्स संदर्भातील समस्यांच्या समाधानासाठी कंपनी विचार करत आहे. त्याकरता संभावित समाधानांचे परीक्षण करण्यासाठी वेगवेगळ्या नवीन उपक्रमांचे देखील कंपनी समर्थन करेल. बोस यांनी माहिती दिली की, त्यांची कंपनी बँकिंग भागीदारांबरोबर त्यांची डिजिटल उपस्थिती चांगली बनवण्यासाठी काम करत आहे. देशातील विविध भागामध्ये आर्थिक पोहोच वाढवण्यासाठी एक वर्षापेक्षा अधिक काळासाठी कंपनी काम करत आहे.

WhatsApp Pay पेमेंट सर्व्हिस 


WhatsApp त्यांच्या पेमेंट सर्व्हिस WhatsApp Pay चे परीक्षण भारतात 2018 पासून सुरू केले आहे. ही यूपीआय आधारित सर्व्हिस युजर्सना रक्कम पाठवणे आणि प्राप्त करण्याची सुविधा उपलब्ध करून देते. यांची स्पर्धा भारतात सॉफ्टबँक समर्थित पेटीएम, फ्लिपकार्टचे फोनपे आणि गूगल पे बरोबर आहे. नियामक अडचणींमुळे कंपनीला ही सेवा अद्याप भारतात पूर्णपणे लागू करता आली नाही. बोस म्हणाले, येत्या काही वर्षांत बँकिंग सेवासुलभ आणि विस्तारित करण्यासाठी (विशेषत: ग्रामीण आणि निम्न उत्पन्न वर्गात) आम्हाला अधिक बँकांशी जोडले जायचे आहे.


आम्हाला आरबीआयने नमूद केलेल्या मूलभूत आर्थिक सेवांसारख्या इतर उत्पादनांमध्ये आपला उपयोग वाढवायचा आहे. आम्ही याची सुरुवात मायक्रो पेन्शन आणि विम्याने करू इच्छितो. बोस म्हणाले की, येत्या दोन-तीन वर्षात असंघटित क्षेत्रातील अल्प वेतनधारक कामगारांपर्यंत देखील विमा, मायक्रोक्रेडिट आणि पेन्शन या तीन उत्पादनांची मदत पोहोचवायची आहे.



[हे वाचा-👮🏻 10 हजार पोलिस शिपायांची भरती होणार]