job marathi Payment will be made through UPI even if there is no money in the account... know how

खात्यात पैसे नाही तरी UPI द्वारे पेमेंट होणार...जाणून घ्या कसे काय

आता बँक खात्यात पैसे नसले तरी पेमेंट करता येणार, रिझर्व्ह बँकेचा नवीन प्लॅन; जाणून घ्या सविस्तर


मुंबई : आजकाल सर्वकाही डिजिटल होऊ लागले आहे. तंत्रज्ञानाच्या युगात आज पैसे देवाण घेवाण देखील डिजिटल स्वरूपात केली जाऊ लागली आहे. यामध्ये आपण पहिले तर आजकाल प्रत्येकजण फोन पे, गुगल पे, पेटीएम इत्यादी UPI (Unified Payment Interface)अॅप्सद्वारे पेमेंट करतो आहे. मात्र आता तुमच्या खात्यात पैसे नसले तरी तुम्हाला क्रेडिट मिळेल आणि तुम्ही पेमेंट करू शकाल, असे आरबीआयने जाहीर केले आहे. जसे आपण क्रेडिट कार्डने पैसे भरतात. म्हणजे आता तुमचा UPI क्रेडिट कार्डप्रमाणे काम करू लागेल.




यावर रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास  (Shaktikant Das) यांनी म्हंटले आहे की, डिजिटल पेमेंटला प्रोत्साहन देण्यासाठी आणि युनिफाइड पेमेंट इंटरफेस (UPI) सारखे पर्याय अधिक आकर्षक बनवण्यासाठी ही घोषणा करण्यात आली आहे. तसेच आता वापरकर्त्यांना UPI वर क्रेडिट कार्ड सारखी सुविधाही मिळेल. पूर्व-मंजूर रक्कम बँकांकडून वापरकर्त्यांना दिली जाईल, जी खात्यात पैसे नसतानाही वापरली जाऊ शकते.

सेकन्डहँड Laptop A1 कंडीशनमध्ये घेण्यासाठी क्लिक करा.


पुढे बोलताना दास यांनी सांगितले की, UPI च्या माध्यमातून देशात होणाऱ्या व्यवहारामध्ये कमालीची वाढ झाली आहे. डिजिटलला प्रोत्साहन देण्यासाठी व लोकांमध्ये अधिक लोकप्रिय करण्यासाठी आणि वापरकर्त्यांना अधिक सुविधा देण्यासाठी अनेक निर्णय घेण्यात आले आहेत. Paytm, PhonePe किंवा Google Pay सारख्या अॅप्सद्वारे UPI पेमेंट करणाऱ्या वापरकर्त्यांना आता पूर्व-मंजूर क्रेडिट लाइन दिली जाईल. ही रक्कम बँका किंवा वित्तीय संस्था ठरवतील. वापरकर्ते त्यांच्या खात्यात पैसे नसतानाही ही रक्कम वापरू शकतील. 


क्रेडिट कार्डप्रमाणे व्याज भरावे लागणार

ही सुविधा सुरू केल्यानंतर, UPI द्वारे, ग्राहकांना बँकांनी दिलेल्या क्रेडिटचा वापर पेमेंटसाठी करता येईल. मात्र या सुविधेच्या बदल्यात बँका तुमच्याकडून काही व्याज आकारतील. 

हे पण पहा

IPL Free On Jio Cinemas : जिओ सिनेमावर आयपीएल मोफत, सविस्तर वाचा एका क्लिकवर

जाणून घ्या क्रेडिट लाइन म्हणजे काय

क्रेडिट लाइन ही बँकेने वापरकर्त्यासाठी सेट केलेली मर्यादा असेल, वापरकर्ता खर्च करू शकणारी रक्कम असेल. बँका आणि वित्तीय संस्था वापरकर्त्याचे उत्पन्न आणि कर्जाची परतफेड करण्याच्या क्षमतेचे मूल्यांकन करून ही क्रेडिट लाइन तयार करतील. एक प्रकारे UPI वर ओव्हरड्राफ्ट सारखी सुविधा देखील दिली जाईल. जिथे ग्राहक गरजेनुसार ही रक्कम वापरेल आणि नंतर ही रक्कम व्याजासह परत करेल.