🚆 भारतीय रेल्वेमध्ये अप्रँटिसच्या पदांसाठी भरती जाहीर झाली आहे. दक्षिण-पश्चिम रेल्वेमध्ये अप्रँटिसच्या सुमारे 1004 पदांसाठी ही होणार आहे.
👉 तसेच यामध्ये वेगवेगळ्या विभागातील अप्रँटिसच्या पदांची संख्या निर्धारित करण्यात आली आहे.
▪️ पदसंख्या -
हुबळी 287, कॅरिएज रिपेअर वर्कशॉप हुबळी 217, बंगळुरू डिव्हिजन 280, म्हैसूर डिव्हिजन 280, म्हैसूर डिव्हिजन 177, सेंट्रल वर्कशॉप, म्हैसूर 43 अशी पदे भरली जाणार आहेत.
🎓 पात्रता -
कुठल्याही मान्यताप्राप्त बोर्डामधून दहावीमध्ये किमान 50 टक्के गुण असावेत, त्याशिवाय संबंधित ट्रेडमधील ITI चा डिप्लोमा असणे आवश्यक आहे.
🤓 वयोमर्यादा -
या भरती प्रक्रियेसाठी 24 वर्षे एवढी कमाल वयोमर्यादा निश्चित करण्यात आली आहे.
💸 शुल्क -
सामान्य आणि ओबीसी यांच्याशाठी 100 रुपये तर आरक्षित वर्ग आणि महिलांसाठी कुठलेही शुल्क आकारण्यात येणार नाही.
💁🏻♂️ निवड प्रक्रिया -
अर्ज करणाऱ्या उमेदवारांमधून पात्र उमेदवारांची निवड परीक्षेशिवाय होणार आहे. ही प्रक्रिया शैक्षणिक पात्रतेच्या आधारावर होईल.
📍दरम्यान, या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 9 जानेवारी 2021 असून, इच्छुक उमेदवारांनी या वेळेच्या आत अर्ज करणे आवश्यक आहे.
👉 अर्ज येथे करा -
इच्छूक उमेदवार रेल्वेच्या या संकेतस्थळावर जाऊन अर्ज करू शकतात. Click here
0 Comments
Post a Comment