🚨 ब्रेकिंग! राज्यात पोलीस भरतीसाठी मंत्रिमंडळाची मंजुरी; भरणार 12,500 पदे

👮‍♂️ राज्यात होणाऱ्या 12,500 पोलिसांच्या भरतीच्या प्रस्तावाला मंत्रिमंडळाने मंजुरी दिल्यामुळे लवकरच हि भरती केली जाणार असल्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी म्हटले आहे.  


👉 कोरोनाकाळात विविध क्षेत्रातील भरतीला स्थगिती दिली गेल्याने राज्यातील हजारो युवक-युवती पोलीस भरतीच्या प्रतीक्षेत होते. मात्र आता पोलीस भरतीच्या निर्णयामुळे अनेकांना दिलासा मिळाला आहे.

❓ भरतीप्रक्रियेविषयी झाला निर्णय..:

▪️ आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत कोविड काळात पोलिसांवरील वाढता ताण लक्षात घेता पोलीस भरतीबाबत निर्णय घेण्यात आला असून जवळपास साडेबारा हजार पदे या भरतीप्रक्रियेतून भरली जाणार आहेत.

▪️ कोरोनाकाळात अनेक पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्यामुळे तसेच यंत्रणेवर अतिरिक्त ताण पडल्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत होता.

▪️ याच अनुषंगाने राज्य सरकारने डिसेंबरपर्यंत राज्यात पोलीस भरती प्रक्रिया राबवण्याची घोषणा यापूर्वीच केली होती. त्याला आज मंत्रिमंडळाने मंजुरी दिली.


📍 दरम्यान, सदरील भरतीप्रक्रियेसाठी मंजुरी दिल्याच्या पार्श्वभूमीवर पोलीस भरतीबाबत राज्य सरकारने हालचाली सुरु केल्या आहेत.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖