Bharat Gaikwad case : पुण्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. राज्य पोलीस दलात सहाय्यक पोलीस प्रमुख म्हणून कार्यरत असलेल्या एका अधिकाऱ्याने पत्नी आणि पुतण्याची गोळ्या झाडून हत्या केली आहे. त्यानंतर त्यांनी स्वत:वरही गोळी झाडून आत्महत्या केली आहे.


भरत शेखा गायकवाड असे आत्महत्या केलेल्या पोलीस अधिकाऱ्याचे नाव आहे. त्यांची पत्नी मोनी गायकवाड आणि पुतण्या दीपक गायकवाड यांची या पोलीस अधिकाऱ्याने गोळ्या झाडून हत्या केली आहे. भरत गायकवाड हे अमरावती पोलिस दलाच्या राजपेश विभागात सहायक आयुक्त आहेत. त्यांचे कुटुंब पुण्यातील बालेवाडी परिसरात राहते.


मोनी गायकवाड (44) आणि त्यांचा पुतण्या दीपक गायकवाड (35) यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. भरत गायकवाड यांनीही स्वत:वर गोळी झाडली. घटनेची माहिती मिळताच चतु:श्रृंगी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. भरत गायकवाड हे अमरावती पोलिस दलात सहायक आयुक्त आहेत. त्यांचे कुटुंब पुण्यात राहते. ते नुकतेच पुण्यात सुट्टीवर आले होते.


दरम्यान, भरत गायकवाड हे शनिवारी सुट्टीनिमित्त पुण्यात होते. त्यानंतर रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास त्यांनी पत्नी आणि पुतण्याची गोळ्या झाडून हत्या केली. त्यानंतर त्यांनी स्वत:वरही गोळी झाडून आत्महत्या केली आहे. त्यांनी वैयक्तिक परवाना असलेल्या पिस्तुलचा वापर केला आहे.

दरम्यान, भरत गायकवाड यांनी एवढी टोकाची पाऊल का उचलले हे स्पष्ट झालेले नाही. घटनेची माहिती मिळताच पुणे पोलिस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.