व्यवसाय सुरु कराचाय पण पैसे नाही, काळजी करू नका; 'या' सरकारी योजनेतून मिळेल स्वस्त कर्ज..


व्यवसाय सुरु कराचाय पण पैसे नाही, काळजी करू नका; 'या' सरकारी योजनेतून मिळेल स्वस्त कर्ज.. I  Want to start a business but don't have money, don't worry; You will get cheap loan from this government scheme.व्यवसाय सुरु कराचाय पण पैसे नाही, काळजी करू नका; 'या' सरकारी योजनेतून मिळेल स्वस्त कर्ज.. I  Want to start a business but don't have money, don't worry; You will get cheap loan from this government scheme., काळजी करू नका; 'या' सरकारी योजनेतून मिळेल स्वस्त कर्ज.. I  Want to start a business but don't have money, don't worry; You will get cheap loan from this government scheme.



केंद्र सरकारने देशाच्या विकासासाठी अनेक योजना सुरू केल्या आहेत. यामध्ये अशा अनेक योजना आहेत, ज्याचा वापर करून ज्यांना स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा आहे त्यांच्यासाठी फायदेशीर आहेत. राज्य आणि केंद्र सरकार अनेक योजनांद्वारे लोकांना व्यवसाय सुरू करण्यासाठी पैसे (फंड) देत आहे, ज्याच्या मदतीने तुम्ही व्यवसाय सुरू करू शकता.


तुम्हालाही आता तुमचा स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा असेल आणि तुमच्याकडे व्यवसाय सुरू करण्यासाठी पैसे नसतील तर तुम्ही सरकारी योजनांचा लाभ घेऊ शकता. अशा परिस्थितीत जाणून घ्या त्या योजनांबद्दल, ज्यातून लोकांना निधी उपलब्द होत आहे.


मुद्रा योजना 

ज्यांना स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा आहे त्यांच्यासाठी ही योजना खूप प्रभावी ठरली आहे. या योजनेत सरकार लोकांना कमी व्याज आणि कमी अटींसह व्यवसाय सुरू करण्यास देत आहे. यामध्ये शिशू, किशोर आणि तरुण या तीन श्रेणींमध्ये कर्ज दिले जाते. आतापर्यंत यात २७.२८ कोटी खाती उघडण्यात आली असून ६८ टक्के महिलांना कर्ज देण्यात आले आहे. तसेच आतापर्यंत १४.०२ लाख कोटी रुपये कर्ज देण्यात आले आहेत.

स्टँड अप इंडिया योजना 

स्टँड अप इंडिया योजनेचा उद्देश नवीन प्रकल्पासाठी किमान एका अनुसूचित जाती किंवा अनुसूचित जमातीच्या महिला कर्जदाराला प्रत्येक बँकेच्या शाखेतून १० लाख ते १ कोटी रुपयांचे कर्ज देणे आहे. यासोबतच सरकार महिला, अनुसूचित जाती, अनुसूचित जमात आणि ओबीसींमध्ये उद्योजकतेला प्रोत्साहन देत आहे. यामध्ये आतापर्यंत १ पेक्षा जास्त व्यक्तींना लाभ मिळाला असून २३,८२७ कोटी रुपयांचे कर्ज देण्यात आले आहे.


 क्रेडिट गॅरंटी फंड योजना 

सीजीएस ही एक सरकारी योजनेद्वारे व्यवसाय कर्ज दिले जाते. या योजनेद्वारे सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांसाठी कर्ज दिले जाते. यामध्ये गॅरंटी कव्हरही देण्यात आले आहे. याद्वारे विविध स्तरांवर कर्ज दिले जाते.

कौशल्य विकास योजना :

या योजनेंतर्गत लोकांना रोजगारासाठी फक्त कर्ज दिले जात नाही, तर ते कौशल्यपूर्ण म्हणून साजरे केले जातात. यामध्ये तरुणांना विविध क्षेत्रातील व्यावसायिक प्रशिक्षण दिले जाते, ज्यातून ते स्वतःचा व्यवसाय सुरू करत आहेत. यासाठी अनेक कौशल्य विकास केंद्रेही सुरु करण्यात आली आहेत.


स्वानिधी योजना :

सरकार प्रत्येक वर्गासाठी कर्ज योजना आणत आहे. या योजनेद्वारे देशातील रस्त्यावरील विक्रेत्यांना स्वतःचे काम नव्याने सुरू करण्यासाठी पैसे दिले जात आहेत. यामध्ये लोकांना छोट्या व्यवसायासाठी १०,००० रुपयांपर्यंतचे कर्ज दिले जाते, जे एका वर्षात फेडावे लागते.


 इतर योजना :

सरकारने स्टार्टअपला प्रोत्साहन देण्यासाठी अनेक योजना सुरू केल्या आहेत, ज्यात व्हेंचर कॅपिटल योजना, एनसीईएफ पुनर्वित्त योजना, डेअरी उद्योजकता विकास योजना, आंतरराष्ट्रीय सहकार्य योजना इत्यादींचा समावेश आहे.




ही माहिती जास्तीत जास्त शेअर करा

Jobmarathi