मेष:-रेस जुगारातून लाभ संभवतो. शक्यतो प्रवास टाळावा. कौटुंबिक जबाबदारी उत्तमरीत्या पेलाल. घरासाठी मोठ्या वस्तु खरेदी केल्या जातील. घेतलेल्या कष्टाचे चीज होईल.

वृषभ:- आपला नावलौकिक लक्षात घेऊन वागावे. काहीसा मानसिक ताण संभवतो. दिवसभर कामाचा व्याप राहील. स्वत:चेच म्हणणे खरे करायला जाल. कौटुंबिक खर्चात वाढ होईल.

मिथुन:- प्रवासात काहीसा त्रास संभवतो. तुमच्या मानाला धक्का लागण्याची शक्यता आहे. गरज पडल्यास दोन पावले मागे यावे. स्त्री सौख्याचा लाभ होईल. आपले मत योग्य प्रकारे मांडा.

कर्क:- आवडते पदार्थ खायला मिळतील. महत्त्वाची कागदपत्रे सांभाळून ठेवा. घराबाहेर वावरतांना सतर्क रहा. मौल्यवान वस्तूंची काळजी घ्यावी. बाहेरील अन्नपदार्थ टाळावेत.

सिंह:- तुमच्या व्यक्तिमत्वावर लोक खुश होतील. मित्र मंडळींचा गोतावळा जमवाल. पत्नीशी वादाचे प्रसंग येवू शकतात. हाताखालील लोकांकडून कामे व्यवस्थित पूर्ण करून घ्याल. विरोधकांचा विरोध मावळेल.

कन्या:- कामाचे योग्य नियोजन करावे. दिरंगाईवर मात करावी लागेल. वरिष्ठांचा आदेश वेळेवर पूर्ण करा. मानसिक स्थैर्य जपावे. उत्तम कौटुंबिक सौख्य लाभेल.

तूळ:-  मनातील जुनी इच्छा पूर्ण होईल. काही कामात अधिक कष्ट घ्यावे लागतील. वेळ आणि काम यांची सांगड घाला. मुलांचे वागणे स्वातंत्र्यप्रिय राहील. क्रोधावर नियंत्रण ठेवावे.

वृश्चिक:- तुमचे श्रम वाढू शकतात. पत्नीशी मतभेदाची शक्यता आहे. जुनी प्रकरणे सामोरी येवू शकतात. व्यावसायिक स्थैर्य लाभेल. प्रवासात सावधानता बाळगावी.

धनू:- कामानिमित्त घरापासून दूर जावे लागेल. संसर्गजन्य विकारांपासून जपावे. इतरांच्या आनंदात सहभागी व्हाल. उपासनेला वेळ मिळेल. गुरूजनांच्या आशीर्वादाचा लाभ मिळेल.

मकर:-योग्य वेळी केलेली गुंतवणूक फायदेशीर ठरेल. कामे कमी श्रमात पार पडतील. चुकीच्या मार्गाचा अवलंब करू नका. नैराश्याला बळी पडू नका. बोलतांना इतरांचे मन दुखवू नका.

कुंभ:-  भागीदारीतील प्रश्न सामोपचाराने सोडवाल. चैनीच्या वस्तूंकडे ओढ वाढेल. धार्मिक कामात सहभाग घ्याल. घरातील टापटि‍पी बाबत आग्रही राहाल. मुलांच्या खोडकरपणात वाढ होईल.

मीन:-इतरांच्या वागण्याचा फार विचार करू नका. कफ विकाराचा त्रास संभवतो. हाताखालील लोकांचे उत्तम सहकार्य मिळेल. कामाच्या ठिकाणी दिवस चांगला जाईल. निसर्ग सौंदर्यात रमून जाल.

 राशिभविष्य; 10 मे 2021

Jobmarathi | Astrology

1. मेष : घरगुती वातावरण चांगले राहील. व्यावसायिक चिंता मिटू शकतील. कामाची धांदल उडेल.

2. वृषभ : कर्तृत्वाला चांगला वाव मिळेल. धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन कराल. मनातील इच्छा पूर्ण होईल.

 

3. मिथुन : उधारीची कामे टाळावीत. अचानक धनलाभ संभवतो. ठरवलेली कामे सुरळीत पार पडतील.

 

4. कर्क : नवीन मित्र जोडाल. परोपकाराची जाणीव ठेवून वागाल. गुरूजनांचा आशीर्वाद मिळेल.

 

5. सिंह : जोडीदाराशी जुळवून घ्यावे लागेल. तुमच्या कलेचे कौतुक केले जाईल. पत्नीच्या प्रकृतीची काळजी घ्यावी.

 

हे पण पहा

[Postal Circle] भारतीय डाक विभागात महाराष्ट्र सर्कल मध्ये 2428 जागांसाठी भरती Maharashtra Postal Circle Recruitment

 

6. कन्या : छुप्या शत्रूंच्या कारवायांवर बारीक लक्ष ठेवावे. नातेवाईकांना मदत कराल. भांडणात सहभाग घेऊ नका.

 

7. तूळ : मनाची द्विधावस्था टाळावी. मुलांच्या स्वतंत्र विचारांचा रोख जाणून घ्यावा. जोडीदाराच्या मताचा आदर करावा.

 

8. वृश्चिक : वाहन वेगावर नियंत्रण ठेवावे. नवीन कामात अधिक लक्ष घालावे. पत्नीशी मतभेद वाढवू नका.

 

9. धनु : कामातून समाधान शोधावे. प्रवासात योग्यती खबरदारी घ्यावी. अती साहस करायला जाऊ नका.

 

10. मकर : काही बदल अनपेक्षित असू शकतात. इच्छा नसतांना प्रवास करावा लागू शकतो. मनातील नैराश्य दूर सारावे.

 

11. कुंभ : पित्तविकाराचा त्रास जाणवू शकतो. निराशाजनक विचारांना मनात थारा देऊ नका. शांततेचे धोरण स्वीकारावे लागेल.

 

12. मीन : क्षुल्लक शंकांना मनात थारा देऊ नका. वादविवादात सहभागी होऊ नका. नवीन कामे अंगावर पडतील.