🗓️ दहावी-बारावी बोर्डाचे संभाव्य वेळापत्रक जाहीर; बारावीची परीक्षा 23 तर दहावीच्या परीक्षेला 29 एप्रिलला!

😷राज्य शिक्षण मंडळाकडून घेण्यात येणाऱया दहावी आणि बारावीच्या बोर्डाच्या परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक अखेर राज्य शिक्षण मंडळाने जाहीर केले. त्यानुसार बारावी बोर्डाची परीक्षा 23 एप्रिलपासून सुरू होणार असून दहावीची परीक्षा यंदा 29 एप्रिलला सुरू होणार आहे. दरम्यान, हे संभाव्य वेळापत्रक बोर्डाने आपल्या वेबसाईटवर जाहीर केले आहे.

🔰राज्य शिक्षण मंडळाकडून मुंबई, पुणे, नागपूर, संभाजीनगर, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि नऊ विभागीय मंडळामार्फत दरवर्षी घेण्यात येणाऱया बोर्डाच्या परीक्षा यंदा उशिराने घेण्यात येणार असल्याचे शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी जाहीर केले होते. अखेर बोर्डाने यावर शिक्कामोर्तब करीत विद्यार्थ्यांसाठी संभाव्य वेळापत्रक जाहीर केले आहे.  त्यानुसार बारावीची परीक्षा 23 एप्रिल ते 21 मे 2021 या कालावधीत घेण्यात येणार आहे, तर दहावीची परीक्षा 29 एप्रिल ते 20 मे 2021 पर्यंत घेतली जाणार आहे.

⏱️प्रात्यक्षिक परीक्षा, श्रेणी, तोंडी परीक्षांचे वेळापत्रक परीक्षेपूर्वी शाळा आणि कॉलेजांना कळविण्यात येणार आहे. बोर्डाने जाहीर केलेल्या संभाव्य वेळापत्रकाबाबत विद्यार्थी-पालकांना काही हरकती किंवा सूचना असल्यास 22 फेब्रुवारीपर्यंत लेखी स्वरूपात बोर्डाला कळविण्याचे आवाहन राज्य शिक्षण मंडळाने केले आहे.

अफवांवर विश्वास ठेवू नका

बोर्डाने वेबसाईटवर जाहीर केलेल्या वेळापत्रकाशिवाय विद्यार्थी पालकांनी इतर कोणत्याही वेळापत्रकावर विश्वास ठेवू नये, तर सोशल मीडियावर व्हायरल होणाऱया वेळापत्रकांवरदेखील विश्वास ठेवू नका, असे आवाहन बोर्डाच्या वतीने करण्यात आले आहे.

👍 _या विविध बातम्या नक्की शेयर करा
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here