🔰 स्टेट बँक ऑफ इंडियाने शाखा उघडण्याच्या आणि बंद करण्याच्या वेळेतही बदल केलाय. तसेच बँक आता निवडक कामेच करणार आहे


 

● ग्राहकांनी केवळ अत्यंत महत्त्वाच्या कामांसाठी बँकेच्या शाखेत भेट द्यावी. तसेच बँकेच्या कामासाठी 31 मेपर्यंत सकाळी 10 ते दुपारी 2 पर्यंत शाखा सुरु राहील.

● दुपारी 2 नंतर शाखा बंद होणार असल्याची माहिती ऑल इंडिया बँक ऑफिसर असोसिएशनने जारी केलेल्या निवेदनात दिली आहे.

🔹 नवीन वेळ

● एसबीआय शाखा आता सकाळी 10 ते दुपारी 2 या वेळेत खुली राहील. बँकेची प्रशासकीय कार्यालये आणि 50 टक्के कर्मचारी यांच्यासह संपूर्ण बँकेच्या कार्यालयीन वेळेत पूर्वीप्रमाणेच सुरू राहतील, असंही बँकेनं नवीन अधिसूचनेत स्पष्टपणे सांगितलेय.

🔹मास्क नसलेल्यांना शाखेत प्रवेश मिळणार नाही

SBI ने ट्विटरवर दिलेल्या माहितीनुसार बँकेत आता फक्त 4 काम करता येतील

(1) पैसे ठेवणे आणि पैसे काढणे
(2) चेकशी संबंधित कामे
(3) डीडी अर्थात डिमांड ड्राफ्ट/RTGS/NEFT शी जोडलेली कामे
(4) शासकीय चालान