🌪️ मागील काही दिवस महाराष्ट्रासाठी अत्यंत कठीण होते. एकीकडे कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असताना राज्यावर तौत्के चक्रीवादळाचं संकट आलं होतं.

💁🏻‍♂️ या संकटाचा महाराष्ट्रानंसामना केला आहे. तसेच तौत्के चक्रीवादळाचे अद्याप पंचनामेही झाले नाहीत, तोपर्यंत राज्यात मान्सूनची चाहूल लागली आहे.

🌧️ अंदमानमध्ये मान्सून दाखल –

_▪️21 मे रोजी अंदमान आणि निकोबार बेटावर मान्सून दाखल होणार असल्याचा हवामान खात्याचा अंदाज खरा ठरला असून काल तिथे मान्सूननं हजेरी लावली आहे._

_▪️तसेच पुढील 8 दिवसांत म्हणजेच दरवर्षी प्रमाणे 1 जून रोजी केरळात मान्सूनचं आगमन होणार असल्याची माहिती हवामान खात्याकडून देण्यात आलं आहे._

⛈️ राज्यातही पावसाची शक्यता –

_👉 तत्पूर्वी पुढील 3 ते 4 दिवसांत मध्य महाराष्ट्रासह घाट भागात काही ठिकाणी मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे._

📍दरम्यान, सोमवारी आणि मंगळवारी पुणे, सातारा, नाशिक आणि कोल्हापूर जिल्ह्यात पावसाला सुरुवात होणार असून 10 जूनला मान्सून राज्यात दाखल होणार आहे.