💫 मोदी सरकारने शेतकऱ्यांसाठी एक महत्वाची योजना आणली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना खरोखरच 15 लाख रुपये दिले जात आहेत. 

👉 केंद्र सरकारच्या FPO योजनेतंर्गत ही आर्थिक मदत केली जात आहे. केंद्र सरकारने 2024 पर्यंत देशात 10 हजार FPO निर्मितीचे उद्दिष्ट ठेवले आहे. 

FPO म्हणजे काय?

▪️FPO चा अर्थ शेतकरी उत्पादन संघटना असा आहे. म्हणजेच कृषी उत्पादन व संबंधित व्यवसायांशी जोडला गेलेला शेतकऱ्यांचा एक समूह म्हणजे FPO होय.

👀 शेतकऱ्यांना याचा फायदा काय?

▪️FPO मध्ये शेतकरी एकत्र असल्यामुळे लहान शेतकऱ्यांनाही त्यांचा शेतमाल चांगल्या भावात विकता येऊ शकतो.

👉 तसेच याशिवाय, FPO संघटनांना खते, रसायने आणि बियाणे स्वस्तात उपलब्ध करुन दिली जाणार आहेत.

🤔 15 लाख कसे मिळणार?

▪️मोदी सरकारच्या या योजनेनुसार किमान 11 शेतकऱ्यांचा समूह आपली स्वतंत्र संघटना FPO स्थापन करु शकतात.

▪️पठारी प्रदेशातील FPO मध्ये किमान 300 शेतकरी असावेत. तर डोंगराळ भागातील FPO मध्ये 100 शेतकरी असायला हवेत. 

👉 नाबार्ड कन्सल्टन्सी सर्व्हिसेसकडून या FPO ना रेटिंग दिले जाईल. या रेटिंगच्या आधारे शेतकऱ्यांना पैसे दिले जाणार आहेत.

📍दरम्यान, तुम्हाला FPO स्थापन करायची असल्यास लघु कृषक कृषि व्यापार संघाशी संपर्क साधून माहिती मिळवता येईल.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

👍 हि माहिती नक्की शेअर करा..!

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here