📣 वाहन चालवताना गुगल मॅप वापरणं पडणार महागात – ५ हजाराचा होऊ शकतो दंड

🔰 आपल्याला कुठं जायचे असेल आणि तिथला मार्ग माहीत नसेल, तर आपण गुगल मॅप वापरतो पण तुम्हाला ते महागात पडू शकतं.

▶️ कारण वाहतूक नियमांमध्ये ते बसत नाही , दिल्लीमधील एका व्यक्तीला याच अपराधामुळे मोठा दंड भरावा लागला.

☑️ जाणून घ्या त्या विषयी सविस्तर ?

▶️ कार चालकाने म्हटलं, की मी तर कुणाशी फोनवर बोलत नव्हतो, मग माझ्याकडून दंड का वसूल केला? यावर पोलिसांनी सांगितलं की

▶️ मोबाईल फोन हातात किंवा डॅशबोर्डवर ठेऊन गुगल मॅप वापरत असाल, तर ते वाहतूक नियमांचं उल्लंघन मानलं जाते कारण अशावेळी तुमचं योग्य लक्ष वाहन चालवण्यावर राहत नाही

▶️ त्यामुळे वाहन चालवताना जर तुम्हाला गुगल मॅप वापरायचा असेल, तर तो मोबाईल होल्डरवर ठेऊनच वापरावा अन्यथा जर तुम्ही हातात किंवा डॅशबोर्डवर ठेऊन मोबाईलवर गुगल मॅप वापरत असाल तर आपल्याला Motor Vehicle Act 2020 अंतर्गत ५ हजार रूपयांचा दंड आकारला जाऊ शकतो.
=============================

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here