⚠️ कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर होत असल्या कारणाने एप्रिलपासून लॉकडाऊन करण्यात आला. तो 15 दिवसाने वाढवत आता मे महिना अखेर आला आहे. 31 मे पर्यंत लॉकडाऊन कायम आहे.

� 1 जून नंतर लॉकडाऊन वाढणार की शिथिल होणार? लोकांना आपले व्यवसाय सुरू करता येणार की नाही? असे अनेक प्रश्न नागरिकांच्या मनात आहेत.

✅ मुख्यमंत्र्यांनी परिस्थिती पाहून निर्णय घेण्यात येईल असे सांगितले होते. मात्र, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी कोरोना मुळे आरोग्यव्यवस्थेशी संबंधित काही महत्वाची माहिती दिली आहे.

👌नाशिक, नागपूर, पुणे, मुंबई या कोरोना हॉटस्पॉट ठरलेल्या शहरात लॉकडाऊन मुळे सकारात्मक परिणाम जाणवत आहे असे ते म्हणाले.

❗मात्र, कोरोना आता ग्रामीण भागात हातपाय पसरत आहे. त्यामुळे आरोग्यव्यवस्थेशी संबंधित तिथले आव्हान वाढले आहे.

💁🏻‍♀️ 1 जून नंतर ज्या जिल्ह्यात परिस्थिती नियंत्रणात आहे असे वाटेल तिथे लॉकडाऊन हळूहळू शिथिल होईल असे ते म्हणाले. मात्र, ज्या भागात कोरोना आताच वाढायला सुरवात झाली आहे तिथे परिस्थिती पाहून निर्णय घेतला जाईल.

🩺नागरिकांचे आरोग्य आणि सुरक्षितता याला सरकारचे प्राधान्य राहील असेच त्यांनी आपल्या या वक्तव्यातून सूचित केले आहे.

◼️70 हजारांवर रुग्ण रोज आढळत असताना आता लॉकडाऊन मुळे हा आकडा 30 हजारांवर आला आहे.

ℹ️ मात्र, सर्व गोष्टी सुरू झाल्यावर पुन्हा तिसऱ्या लाटेचा धोका आहेच. त्यामुळे, लॉकडाऊन शिथिल केल्यानंतर सुद्धा प्रत्येकाने स्वयंशिस्त पाळणे गरजेचे आहे.

🎯 हि माहिती नक्की शेअर करा..!