ठाकरे सरकारकडून राज्यात नवी नियमावली; जाणून घ्या काय सुरु, काय बंद?

jobmarathi / CORONA UPDATE

राज्यातील करोनाचा वाढता कहर रोखण्यासाठी ठाकरे सरकारने नवी नियमावली जाहीर केली असून यामध्ये २२ एप्रिल ते १ मेपर्यंत कडक निर्बंध लावण्यात आले आहेत.

🤔 राज्यात काय सुरु आणि काय बंद राहणार जाणून घ्या

🔹 रिक्षा-टॅक्सी सेवा सुरू
सार्वजनिक वाहतूक व्यवस्था म्हणजेच बेस्ट किं वा अन्य महानगरपालिकांची परिवहन सेवा सुरू राहील. याशिवाय रिक्षा-टॅक्सीही सुरू राहतील. ओला-उबर सेवाही सुरू असेल.

🔹 दुकाने सकाळी ११ पर्यंत खुली
जीवनावश्यक वस्तू, भाजीपाला, फळे, मटण, अंडी आदी दुकाने सकाळी ७ ते ११ वाजेपर्यंत खुली राहतील. यामुळे लोकांना सकाळी खरेदी करता येईल. त्यानंतर मात्र सबळ कारणाशिवाय घराबाहेर पडता येणार नाही.

🔹 विवाह समारंभाला फक्त दोन तास उपस्थिती :
विवाह समारंभाला फक्त २५ जणांनाच परवानगी देण्यात आली आहे. ३० तारखेपर्यंत लागू करण्यात आलेल्या आदेशात २५ जणांच्या उपस्थितीला परवानगीची अट कायम ठेवताना विवाह कार्यालयात फक्त दोन तास थांबता येईल. त्याचे उल्लंघन करणाऱ्यांना ५० हजार रुपये दंडाची तरतूद करण्यात आली आहे.

🔹 कार्यालयीन उपस्थिती
करोना साथ नियंत्रण व्यवस्थापनाशी संबधित कार्यालये वगळता राज्य आणि केंद्र सरकारी, निमसरकारी, स्थानिक प्राधिकरणाच्या सर्व कार्यालयांमध्ये केवळ १५ टक्के च उपस्थितीला परवानगी देण्यात आली आहे. अन्य सर्व प्रकारच्या कार्यालयांमध्ये जास्तीत जास्त पाच किंवा १५ टक्के कर्मचारी उपस्थिती ठेवता येईल. तर अत्यावश्यक सेवाच्या कार्यालयांमध्ये जास्तीत जास्त ५० टक्के कर्मचाऱ्यांची उपस्थिती ठेवता येईल.

🔹 खासगी वाहतुकीवर निर्बंध :
बस वगळता खासगी वाहने ५० टक्के क्षमतेने चाललवता येतील. मात्र, केवळ तातडीच्या आणि अत्यावश्यक कारणांसाठीच वाहनांचा वापर करता येईल. मात्र, याचा उपयोग एका शहरातून दुसऱ्या शहरात किंवा एका जिल्हयातून दुसऱ्या जिल्ह्यात जाण्यासाठी करता येणार नाही. केवळ नातेवाईकाचे आजारपण किंवा अंत्यसंस्कारासाठी दुसऱ्या शहरात जाता येईल. या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना १० हजार रूपये दंड केला जाईल.

🔹 १४ दिवसांच्या गृहविलगीकरणाचा शिक्का
लांब पल्ल्याच्या रेल्वेगाड्या किं वा खासगी वा सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेच्या बसमधून दुसऱ्या जिल्ह्यात किंवा शहरांमध्ये प्रवास केल्यावर जिथे उतरतील तेथे प्रवाशांवर १४ दिवस गृह विलगीकरणाचा शिक्का मारला जाईल.

🔛 या सेवा सुरू :

▪️ जीवनावश्यक वस्तूंची दुकाने (सकाळी ७ ते ११ पर्यंत)
▪️ शीतगृह
▪️ रिक्षा, टॅक्सी, सार्वजनिक वाहतूक (बसेस)
▪️ बँका, वित्तीय सेवा
▪️ मालवाहतूक
▪️ दूरसंचार सेवा
▪️ कृषी व कृषीवर आधारित सेवा
▪️ ई-कॉमर्स फक्त जीवनावश्यक वस्तू
▪️ पेट्रोलपंप
▪️ माहिती तंत्रज्ञान, विदा सेवा
▪️ सरकारी आणि खासगी सुरक्षा व्यवस्था
▪️ बँकांचे एटीएम
▪️ टपाल सेवा

🔹 वृत्तपत्रांच्या वितरणास परवानगी
वृत्तपत्रे, मासिके आणि नियतकालिकांच्या छपाई आणि वितरणास परवानगी असेल. वृत्तपत्रांचे घरोघरी जाऊन वितरण करता येईल. वृत्तपत्रांच्या वितरणावर कोणतीही बंधने नसतील, हे राज्य सरकारने याआधीच्या आदेशातच स्पष्ट केले होते.

👍 या महत्वाच्या दैनंदिन बातम्या नक्की शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here