भारतात सरकारी नोकरीत ‘या’ पाच सेवांमध्ये मिळतो सर्वाधिक पगार भारतातील तरुणांमध्ये सरकारी नोकऱ्यांची मोठी क्रेझ आहे. भारतातील तरुणांमध्ये सरकारी नोकऱ्यांची मोठी क्रेझ आहे. जेव्हा सरकारी भर्ती निघते तेव्हा त्यामध्ये लाखो तरुण नोकरीसाठी अर्ज करतात. सरकारी नोकरी सर्वात सुरक्षित समजली जाते. खासगी नोकऱ्यांच्या तुलनेत सुरक्षितता आणि पगार चांगला असल्यामुळे सर्वांना शासकीय नोकरी मिळावी, असं सर्वांना वाटतं. भारतात सर्वाधिक पगार मिळणाऱ्या शासकीय नोकऱ्यांमध्ये नागरी सेवा, संरक्षण क्षेत्रातील अधिकारी, सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांमधील नोकऱ्या, शास्त्रज्ञ, डॉक्टर आणि प्राध्यापक यांचा समावेश होतो. नागरी सेवा 

केंद्रीय लोकसेवा आयोगाद्वारे भारतात नागरी सेवांच्या परीक्षा घेतल्या जातात. नागरी सेवांमध्ये नोकरी करणाऱ्यांना भारतात सर्वाधिक प्रतिष्ठा मिळते. यूपीएससीद्वारे घेतल्या जाणाऱ्या नागरी सेवांच्या परीक्षेला लाखो विद्यार्थी अर्ज करतात. नागरी सेवांची परीक्षा तीन टप्प्यात होते. पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा, मुलाखत हे तीन टप्पे उमदेवारांना पार करावे लागतात. त्यानंतर नागरी सेवांमध्ये परीक्षेमध्ये मिळवलेल्या गुणांच्या आधारे आयएएस, आयपीएस, आयएपएस या सेवांमध्ये त्यांची नियुक्ती केली जाते. आयएएस अधिकाऱ्यांचा पगार साधरणपणे 2 लाखांच्या जवळपास असतो. ( Know about top five highest salary govt jobs in India) 


संरक्षण क्षेत्रातील अधिकारी 

भारताच्या संरक्षण क्षेत्रात अधिकारी व्हायचे असेल तर एनडीए आणि यूपीएससीद्वारे घेतली जाणारी सीडीएस म्हणजेच कंब्माइन्ड डिफेन्स सेवेची परीक्षा द्यावी लागते. संरक्षण क्षेत्रातील अधिकाऱ्यांचा पगार आणि सुविधा चांगल्या असतात. या सेवांमध्ये प्रवेश करताना उमेदवारांना 60 हजारांपर्यंत पगार मिळतो. सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्या 

भारतात सरकारच्या मालकीच्या सार्वजिनक कंपन्या आहेत. सार्वजनिक शेत्रातील कंपन्यांमधील नोकरी देखील चांगली मानली जाते. या क्षेत्रातील कंपन्या उमेदवारांना चांगला पगार देतात. भारतात सार्वजनिक क्षेत्रातील बँका, ऑईल कंपन्या आणि इतर उपक्रमांमधील अधिकाऱ्यांना वार्षिक 10 ते 12 लाख रुपये पगार आणि इतर सुविधा मिळतात.


वैज्ञानिक 

देशात जे लोक इस्त्रो आणि इतर संशोधन संस्थांमध्ये नोकरी करतात त्यांना देखील मोठ्या रकमेचा पगार मिळतो. वैज्ञानिकांनी सरकारी प्रकल्प खर्चाशिवाय चांगल्या रकमेचा पगार दिला जातो. यासोबत इतर भत्ते देखील त्यांना दिले जातात. वैज्ञानिकांच्या पगाराच्या रकमेचे वेगवेगळे स्तर केलेले असतात. डॉक्टर, प्राध्यापक 

भारतात प्राध्यापक आणि डॉक्टर यांचा समावेश सरकारी नोकरीत केला जातो. डॉक्टर आणि प्राध्यापक पदावर काम करणाऱ्या व्यक्तींना चांगला पगार मिळतो. पगारासोबत त्यांना चांगल्या सोयी सुविधा दिल्या जातात. वरिष्ठ डॉक्टर आणि प्राध्यापक यांना 50 हजार ते 1 लाखांपर्यंत पगार मिळतो.


Source:- Tv9Marathi

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here