🛫भारतीय वायुसेनेने (आयएएफ) ग्रुप एक्स आणि ग्रुप वाय ट्रेडमध्ये एअरमन भरतीसाठी अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. इच्छुक आणि पात्र अविवाहित पुरुष उमेदवारांसाठी ही एक सुवर्णसंधी आहे. 


अर्ज करण्याची अंतिम तारीख ७ फेब्रुवारी २०२१ आहे. शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा आणि इतर संबंधित पात्रतेबद्दल तपशीलवार माहितीसाठी आपण अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊन तपशीलवार माहिती पाहू शकता.

✔️ शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादा –

या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना मान्यताप्राप्त बोर्ड / संस्थेमधून किमान ५० टक्के गुणांसह १२वी उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. शैक्षणिक पात्रतेबद्दल अधिक माहितीसाठी अधिसूचना पाहू शकता. त्याचवेळी उमेदवाराचा जन्म १६ जानेवारी २००१ ते २९ डिसेंबर २००४ दरम्यान झालेला असावा.


✔️ निवड प्रक्रिया –

उमेदवारांच्या निवड प्रक्रियेत ऑनलाइन चाचणी, शारीरिक तंदुरुस्ती चाचणी, वैद्यकीय चाचणी आणि कागदपत्र पडताळणीचा समावेश आहे. परीक्षा पॅटर्नच्या सविस्तर माहितीसाठी आपण अधिसूचना पाहू शकता.

✔️ असा करा अर्ज

अर्ज करण्यासाठी उमेदवारांना अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी लागेल. ऑनलाईन अर्जासाठीची लिंक वेबसाइटवर २२ जानेवारी २०२१ पासून सक्रिय होईल. सकाळी १० वाजेपासून उमेदवारांना ऑनलाइन नोंदणी करता येणार आहे.


✔️ परीक्षा शुल्क –

– उमेदवारांना परीक्षा शुल्क म्हणून 250 रुपये भरावे लागतील.

✔️ महत्त्वाच्या तारखा –

– ऑनलाइन अर्ज प्रारंभ तारीख : २२ जानेवारी २०२१

– ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख : ७ फेब्रुवारी २०२१

– ऑनलाईन परीक्षेची तारीख : १८ एप्रिल ते २२ एप्रिल २०२१ 

प्रवेशपत्र ४८ ते ७२ तासांपूर्वी दिले जाईल. उमेदवारांच्या नोंदणीकृत ई-मेल आयडीवर परीक्षेच्या तारखेच्या ४८ ते ७२ तासांपूर्वी पाठविली जातील. प्रवेशपत्र अधिकृत पोर्टल airmenselection.cdac.in वर उपलब्ध होईल. उमेदवार अधिकृत पोर्टलवर जाऊन ते डाउनलोड करू शकतील

२२ जानेवारीपासून अधिकृत वेबसाइट  

अधिकृत वेबसाईट: पाहा 


जाहिरात (Notification): पाहा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here