🔲🔲🔲🔲🔲🔲🔲🔲
*वेळ काढून नक्की वाचा*
*विश्रांतीसाठी एखाद्या झाडाखाली बसावं. समोरचं एक विंचू दिसावा.*
*त्याला मारण्या साठी दगड उचलावा.*
*दगडाखालून साप निघावा. त्याने आपला पाठलाग करावा.*
*पळताना ठेच लागून विहीरीत पडावं. विहीरीत मोठी मगर असावी.*
*तिने वेग घेण्यापूर्वी, एखाद्या फांदीचा वेध घ्यावा.*
*वर येण्याचा प्रयत्न करावा. वरती भूकेला वाघ असावा. त्याच्या भितीने फांदीचा हात सुटावा.*
*फांदी वरील मधमाशांनी भडका करावा. आणि… अशा अवस्थेत मधाच्या पोळीतून पडणारा, मधाचा एक थेंब तोंडाने झेलण्याचा प्रयत्न. करावा.*
*यालाच ‘जीवन’ म्हणतात …….*
*बघायला गेलं तर आयुष्यही खूप सोपे असत..!!*
*जगायला गेलं तर दु:खातही सुख असत..!!*
*चालायला गेलं तर निखारेही फूले होतात..!!*
*तोंड देता आले तर संकटही शुल्लक असत..!!*
*वाटायला गेलं तर अश्रूंतही समाधान असत..!!*
*पचवायला गेलं तर अपयशही सोपे असत…!!*
*हसायला गेल तर रडणेही आपल असत …..!!*
*बघायला गेलं तर आयुष्यही खूप सोपे असत..*
*नाती जपण्यात मजा आहे*
*बंध आयुष्यचे विणण्यात मजा आहे जुळलेले सूर गाण्यात मजा आहे*
*येताना एकटे असलो तरी सर्वांचे होऊन जाण्यात मजा आहे*
*नशीब कोणी दुसरं लिहित नसतं आपल नशीब आपल्याच हाती असतं*
*येताना काही आणायचं नसतं जाताना काही न्यायचं नसतं*
*मग हे आयुष्य तरी कोणासाठी जगायचं असतं या प्रश्नाचे उत्तर शोधण्या साठी जन्मायचं असतं…*
!!!!!!!!!!
*पैसे नसतात तेव्हा माणूस झाडपाला खाऊन दिवस काढतो पैसा आल्यावर हाच झाडपाला सलाड म्हणून हॉटेलात खातो*
*पैसे नसतात तेव्हा माणूस सायकलने रपेट करतो, पैसा आल्यावर मात्र हीच सायकल तो जिममध्ये व्यायामा साठी चालवतो.*
*पैसे नसतात तेव्हा रोजीरोटीसाठी त्याची पायपीट चालू असते.*
*पैसे आल्यावर मात्र हीच पायपीट तो चरबी कमी करण्या साठी करतो.*
*माणूस स्वत:शीच प्रतारणा करीत असतो.*
*पत नसली तरी लग्न करायला एका पायावर तयार असतो,*
*ऐपत असली की मात्र त्याला घटस्फोट हवा असतो.*
*पैसे वाचवायला तो कधी बायकोलाच आपली सेक्रेटरी बनवितो,*
*पुढे पैसा आला की सेक्रेटरीलाच बायको सारखे वापरतो.*
*पैसे नसेल तेव्हा तो असल्याचे सोंग आणतो,*
*पैसा असतो तेव्हा मात्र कंगाल असल्याचे नाटक करतो.*
*पैसे नसतात तेंव्हा मिठाई खावीशी वाटते पैसे आल्यावर मधुमेहा मुळे खाता येत नाही.*
*पैसे नसतात तेंव्हा भूक लागते , झोप येते पैसे आल्यावर दोन्ही साठी औषध घ्यावे लागते*
!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!
*माणसा रे माणसा… तू वास्तव तरी कधी स्वीकारतोस?*
*आपल्या सावली पासून आपणच शिकावे*
*कधी लहान तर कधी मोठे होऊन जगावे शेवटी काय घेऊन जाणार आहोत सोबत म्हणून प्रत्येक नात्याला हृदयातून जपावे ॥*
!!!!!!!!
*मला माणसे जोडायला आवडतात, माणसांशी नाती जोडायला आवडतात जोडलेली नाती जपायला आवडतात,*
कारण
*माझा विश्वास आहे की, माझ्या मृत्यु नंतर मी कमावलेली संपत्ती मी माझ्या बरोबर घेऊन जाणार नाही,*
परंतु
*मी जोडलेल्या माझ्या माणसांच्या डोळ्यांतील अश्रूंचा एक थेंब हाच माझ्या करिता लाखमोलाचा दागिना आणि हीच माझी माझ्या आयुष्यातीली खरी कमाई असेल…*
*तुमचे आणि माझे हे नाते*
*माझ्या साठी अनमोल आहे …*
*आज प्रत्येक जण आपली गाडी झाडाच्या सावलीत लावायची खटपट करतो,*
*पण लहानस रोपट लावण्याची खटपट कुणीच करत नाही..!*
*मलाआवडलं म्हणून तर आपल्याला पाठवलं . पुढे पाठवा हा आग्रह नाहीच. चांगला विचार व चांगली सोबत अवश्य सांभाळून ठेवावी….*
👏👏👏
🔲🔲🔲🔲🔲🔲🔲🔲
👉🏻 *जास्तीत जास्त शेयर करा 📲आपल्या मित्रा सोबत 👬नोकरी जाहिराती💼*
*आता लेस्टअप मॅगेझीन सारखी आपली जॉब इन्फॉर्मेशन मॅगेझीन तर लवकर जॉइन करा* 😉👇👇👇
# _*जॉब्स, माहिती मराठीमध्ये तुमच्या WhatsApp 📲 वर फ्री मध्ये, त्यासाठी जॉईन करा जॉब इन्फॉर्मेशन मॅगेझीन , त्यासाठी खलील लिंकवर क्लिक करा कृपया लिंक UC Browser मध्ये ओपन करू नये।*_👇👇👇👇
येथे क्लिक करा
इंस्टाग्रामवर फ़ॉलो करण्यासाठी येथे क्लिक करा
👆👆👆👆👆👆👆👆👆👆 *💼जॉब इन्फॉर्मेशनला👨✈ फ़ॉलो करा इंस्टाग्रामवर*